शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात समुह संसर्गाचा धोका नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:19 IST

जिल्ह्यात समुह संसर्गाचा धोका नसल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा साडेपाचशेच्या टप्प्यात आला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात झपाट्याने कोरोना संसर्गामध्ये वाढ होत असली तरी जिल्ह्यात समुह संसर्गाचा धोका नसल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.दरम्यान, जुलै अखेर बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा ७०० च्या पार जाणार असल्याचा प्रशासनाचा अंदाज असल्याचेही त्या म्हणाल्या. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात डिसेंबर अखेर कोरोना बाधीतांचा आकडा अडीच हजारांच्या घरात जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर प्रशासकीय पातळीवर पायाभूत सुविधांच्या तयारीच्या अनुषंगाने चर्चा झाल्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब अधोरेखीत केली.जून जुलै मध्ये बुलडाणा जिल्ह्यात ६७५ च्या आसपास कोरोना बाधीतांचा आकडा जावू शकतो असा प्रशासकीय पातळीवरील अंदाज सध्या तंतोतंत येत असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र डिसेंबर दरम्यानच्या स्थिती बाबत आयसीएमआरकडून अद्याप कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचे त्या म्हणाल्या. मात्र बुलडाणा जिल्ह्यात वर्तमान स्थितील कोवीड केअर सेंटर, कोवीड हेल्थ सेंटर आणि दहा समर्पीत कोवीड रुग्णालयात संभाव्य स्थिती हाताळण्याच्या दृष्टीने प्रशासन सज्ज असून तीन हजार ६०० च्या आसपास बेडची सुविधा सध्या उपलब्ध असल्याचे त्या म्हणाल्या.बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असला तरी इंडेक्स पर्सन आणि त्याच्याशी संबंधीत व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत असल्याने बुलडाणा जिल्ह्यामध्ये समुह संसर्गाचा धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या व्यतिरिक्त जिल्ह्यातील बाधीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ५५ टक्क्यांच्या आसपास सध्या आहे तर देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्के आहे. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे तसे सारखे बदलत असल्याचेही जिल्हाधिकारी सुमन चंद्रा म्हणाल्या.जिल्ह्यात रॅपीड कीटद्वारे टेस्टींग सुरू झाल्यानंतर रुग्ण वाढीचा वेग वाढला असून आणखी चार हजार रॅपीड टेस्ट किटचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या चाण्यांचा वेग आणखी वाढणार असल्याचे संकेत अप्रत्यक्षरित्या त्यांनी बोलताना दिले. रॅपीड टेस्ट किटसाठी तथा कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारांच्या निधीतून प्रत्येकी दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्याच्या आवाहनाला लोकप्रतिनिधीकंडून प्रतिसाद मिळाला. दरम्यान, रॅपीड टेस्ट किट घेण्यासाठी हा निधी उपयुक्त ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या. आगामी काळात जवळपास १४ हजार रॅपीड टेस्ट किट जिल्ह्याला लागण्याची शक्यता असून त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर सध्या सज्जता असल्याचे त्या म्हणाल्या. कोरोना संसर्गाची व्याप्ती कमी करण्यासाठी तथा रुग्णांना त्वरित सुविधा उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यात पायाभूत सुविधा वाढविण्यास प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्या म्हणाल्या.

कोवीड रुग्णालय लवकरच पुर्णत्वासयेथील स्त्री रुग्णालयामध्ये सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून समर्पीत कोवीड रुग्णालयातील आॅक्सीजन युनीटसह अन्य आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. टाटा ट्रस्टच्या सहकार्यातून हे काम होत असून हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत होण्यास आणखी दोन आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. वीज व्यवस्थेसह वीज रोहीत्र येथे उभारण्यासह अन्य काही कामे अल्पावधीत पूर्ण होऊन हे रुग्णालय दोन आठवड्यानंतर कार्यान्वीत होईल.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या