शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

'माझी कन्या भाग्यश्री' योजनेला प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 11:43 IST

My Daughter Bhagyashree : सहा तालुक्यांत एकही लाभार्थी नसल्याने याठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनाच हरविल्याचे चित्र आहे.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेच्या धर्तीवर जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. या वर्षात अवघ्या २४ लाभार्थ्यांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. तर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत एकही लाभार्थी नसल्याने याठिकाणी माझी कन्या भाग्यश्री योजनाच हरविल्याचे चित्र आहे.मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलांइतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. केंद्र शासनाने बेटी बचाओ-बेटी पढाओ ही योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू केलेली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये मुलींचे जन्माचे प्रमाण कमी आहे, त्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या पार्श्वभूमीवर “माझी कन्या भाग्यश्री” ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेची जनजागृती अद्यापही पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेचा एकही लाभार्थी नाही. २०२१-२२ या वर्षात जिल्ह्यात एकूण २४ लाभार्थी माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी पात्र ठरले आहेत. तर मागील वर्षी याहीपेक्षा कमी लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरले होते. त्यामुळे जिल्ह्यात माझी कन्या भाग्यश्री योजनेची व्याप्ती वाढणे गरजेचे आहे.

असा मिळतो लाभ १ ऑगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या मुलांना योजनेचा लाभ घेता येतो. एक अपत्य कन्या असल्यास ५० हजार रुपये आणि दोन अपत्य कन्या असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपये त्यांच्या नावे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात येते.   एक मुलीच्या अथवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgovernment schemeसरकारी योजना