शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम तोंडावर: हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत नियोजन नाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 15:41 IST

खामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते.

देवेंद्र ठाकरेलोकमत न्युज नेटवर्कखामगाव: यंदाचा तुरीचा हंगाम तोंडावर आला असताना, हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हयात अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येते. शेतकºयांकडून मात्र तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची मागणी जोर धरत आहे.शेतकºयांना शेतमालाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासनाकडून प्रत्येक तालुक्यात हमीभावाने शासकीय खरेदी केंद्र सुरू करून शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचा प्रयत्न गेल्या दोन वषार्पासुन प्रयत्न सुरू आहे. असे असताना, खरेदीचे नियोजन वेळेवर होत नसल्याने हंगाम निघून गेल्यानंतर खरेदी केंद्र सुरू होते व याचा लाभ शेतकºयांऐवजी व्यापाºयांनाच जास्त होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतमालाची शासकीय खरेदी वेळेत सुरू करावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे. यावर्षी उडीद, मुग, सोयाबिन उत्पादक शेतकºयांना खरेदी वेळेत सुरू न झाल्याने आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. हीच परिस्थीती तूर उत्पादक शेतकºयांची होऊ नये, यासाठी तूर खरेदी साठी आॅनलाईन नोंदणी सुरू करावी, अशी मागणी संपुर्ण जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. येत्या पंधरा दिवसात तुरीचा हंगाम सुरू होणार असल्याने शेतकºयांकडून मागणी जोर धरत असताना, संबंधित विभागाकडून मात्र याबाबत कोणतेही नियोजन करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तब्येत बरी नसल्याचे सांगून त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. 

वस्तुस्थिती पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविल्या शेंगा!तुरीचा हंगाम अगदी जवळ आला आहे, हे पटवून देण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील भारीप बहूजन महासंघाच्या पदाधिकाºयांनी शेतकºयांना सोबत घेत तुरीच्या पक्क्या झालेल्या शेंगा तहसीलदारांमार्फत मुख्यंमत्र्यांना पाठविल्या. सोबतच हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी लवकर सुरू करण्याची मागणी करणारे निवेदनही दिले. 

 मागील वर्षीच्या अनुदानाचा प्रश्न निकाली काढा!मागील वर्षी हमीभावाने तूर विक्रीसाठी शेतकºयांनी नोंदणी केलेल्या, परंतु मालाचे मोजमाप होऊ न शकलेल्या शेतकºयांना प्रतिक्विंटल १ हजार रूपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. हे अनुदान अद्याप  अनेक शेतकºयांना मिळाले नाही. अनेकांच्या खात्यात केवळ पाचशे-सातशे रूपये जमा करण्यात आले. ही थट्टा थांबवावी, अशी मागणी स्वाभीमानीचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. यावर्षी तूर खरेदी वेळेत सुरू करण्यासाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

  

सरकारला निवेदनाची भाषा समजत नाही. त्यामुळे यासंदर्भात लवकरच मोठे आंदोलन करण्यात येणार आहे. हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करणे, ही मागणी महत्वाची आहेच; परंतु याचा सर्वाधिक लाभ व्यापाºयांनाच होतो. तेव्हा शेतकºयांनी इतरत्र विक्री केलेल्या मालावरही भावफरक अनुदान देण्यात यावे, अशी आमची मागणी राहणार आहे.- रविकांत तुपकरप्रदेशाध्यक्ष, स्वाभीमानी शेतकरी संघटना

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणाagricultureशेती