शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजनच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:29 IST

बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहरी भागातील जनतेला रानभाज्यांची उपयुक्तता, आवश्यकता आणि महत्त्व कळावे, या भाज्यातील औषधी गुणांची माहिती व्हावी आणि त्यांच्या आहारातही या भाज्यांचा समावेश असावा, या उद्देशाने कृषिमंत्र्यांनी ९ आॅगस्ट रोजी फिजिकल डिस्टन्सिंग राखून रानभाजी महोत्सव साजरा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही.शेतशिवारात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे, रानफळांचे महत्त्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांच्या आहारात त्या भागात उगवणाºया रानभाज्यांचा समावेश असतो. या भाज्या, फळांचे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्व आहे. त्याची माहिती शहरांतील नागरिकांना मिळून विक्री व्यवस्था झाल्यास शेतकºयांनाही काही आर्थिक फायदा होणार आहे. विशेष म्हणजे रानभाज्यात विविध पौष्टिक अन्नघटक असतात. या रानभाज्या नैसर्गिकरीत्या उगवत असल्याने त्यावर कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी केली जात नाही. या नैसर्गिक आहार संपत्तीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊनच शहरी भागातील लोकांत रानभाज्यांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर ९ आॅगस्ट रोजी रानभाजी महोत्सव साजरा करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले होते. मात्र, बुलडाणा जिल्ह्यात महोत्सव घेण्याएवढया रानभाज्या नसल्याने मेळाव्यांचे आयोजनच करण्यात आले नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र