लोणार (बुलडाणा): तालुक्यातील वेणी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच अभिमन्यू साखरे यांच्यावर सोमवार, ८ डिसेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. वेणी येथील सरपंच अभिमन्यू साखरे हे गावातील कामे करताना कोणालाच विश्वासात घेत नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर जावळे, मिलिंद जाधव, कमल इंगळे, सरस्वती जावळे, मंजूषा जटाळे आदींनी निवेदनाद्वारे केली होती. सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ८ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंचावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. तहसील कार्यालयात प्रस्ताव दाखल करताना ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर जावळे, मिलिंद जाधव, कमल इंगळे, सरस्वती जावळे, मंजूषा जटाळे आदींची उपस्थिती होती. सदर अविश्वासावर चर्चा करण्यासाठी वेणी ग्रामपंचायतमध्ये १२ डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
वेणी सरपंचावर अविश्वास दाखल
By admin | Updated: December 8, 2014 23:58 IST