शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

...तर नोव्हेंबर अखेर बुलडाणा जिल्ह्यात ५० हजार कोरोना रुग्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 10:48 IST

आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ५० हजारांच्या पार जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची व्याप्ती वाढत असून असून आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा आकडा ५० हजारांच्या पार जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी व्यक्त केली आहे. सोमवारी शांतता समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.दरम्यान, समितीची बैठक झाल्यानंतर यासंदर्भात त्यांना पुन्हा तेथेच याबाबत विचारणा केला असता ही रुग्ण संख्या वाढण्याच्या शक्यतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. वरिष्ठ पातळीवर प्राप्त माहितीनुसार येत्या काळात ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीदरम्यान बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. दोन दिवसापूर्वी वरिष्ठ पातळीवर राज्यस्तरावर झालेल्या बैठकीदरम्यान बुलडाणा जिल्ह्याला कोरोना रुग्ण वाढण्याच्या शक्यतेचा अलर्ट देण्यात आला असल्याचेही पालकमंत्र्यांनी शांतता समितीच्या बैठकीत शेवटी सांगितले. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक कमी असून आरोग्य क्षेत्रातही पायाभूत सुविधांचा अभाव आहे. अशा स्थितीत नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर सतर्कता बाळगण्याला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.देशातील काही मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश असल्याने वेळीच खबरदारी न बाळगल्यास जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा नोव्हेंबरअखेर वाढण्याची शक्यताही आहे.या दरम्यान कोरोना संसर्गाची दुसरी लाट येवू शकते, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या. या व्यतिरिक्त नव्याने मिळालेल्या माहितीनुसार तथा अभ्यासानुसार थेट श्वासातूनही त्याचा प्रसरा होण्याची भीती आहे. शिंकेद्वारे किंवा मोठ्याने खोकल्यानेही त्याचा प्रसार होण्याची भीती त्यामुळे निर्माण झाली असल्याचे जिल्हाधिकारी चंद्रा म्हणाल्या. त्यानुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यावर भर असल्याचे त्या म्हणाल्या.

मानव विकास निर्देशांक कमीमानव विकास निर्देशांकाच्या बाबतीत बुलडाणा जिल्हा देशात मागासलेला आहे. बुलडाणा जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक हा ०.६८४ आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. आरोग्य विषयकही पायाभूत सविधा कमी आहे. अशा स्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देण्यात येत असून गेल्या ११५ दिवसात त्यादृष्टीने भरीवपणे जिल्ह्यातील आरोग्य विषयक सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला असून नागरिकांनीही प्रशासनाने दिलेल्या सुचनांची परीपूर्णपणे अंमलबजावणी करावी, असे ही स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या