शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ केंद्रात मूर्तींची चोरी, अल्पवयीन चोरटे दोन तासात पोलिसांच्या ताब्यात

By निलेश जोशी | Updated: June 3, 2024 16:26 IST

शहरातील स्वामी समर्थ केंद्रातील मूर्तींसह पूजेसाठीचे साहित्य चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना बुलढाणा पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले.

बुलढाणा : शहरातील स्वामी समर्थ केंद्रातील मूर्तींसह पूजेसाठीचे साहित्य चोरून नेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना बुलढाणा पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरी करण्यात आलेले ५५ हजार २०० रुपयांचे संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आले आहे. जनसामान्यांच्या आस्था आणि श्रद्धेच्या ठिकाणीच चोरट्यांनी हात घातला होता. त्यामुळे जनभावना विचारात घेता बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून हालचाल केली.

स्वामी समर्थ केंद्रात पहाटे दरम्यान ही चोरी झाल्याचे समोर आले. यामध्ये स्वामी समर्थांची पितळीची १२ हजार रुपये किमतीची चार किलो वजनाची मूर्ती, अष्टधातूची महादेवाची पिंड, चांदीचे २० तोळे वजनाचे २२ हजार रुपयांचे झुंबर, अष्टधातूंच्या हत्तीच्या दोन मुर्तींसह अन्य साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते. प्रकरणी स्वामी समर्थ केंद्राचे अध्यक्ष शांताराम जंजाळकर (६७) यांनी बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळ गाठून निरीक्षण केले. तसेच स्थानिकांशी विचारपूस करून गोपनीय माहितीच्या आधारावर आनंदनगर मधून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सांगितले.

या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा आणि डीबी पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नीलेश लोधी, पोलिस कॉन्स्टेबल युवराज शिंदे, विनोद बोरे, रमेश वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक लेकुरवाळे, संजय भुजबळ यांनी सहभाग घेतला होता. गुन्ह्यातील आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्यानुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचेही यावेळी पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले.

टॅग्स :buldhanaबुलडाणा