शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: खामगावातील शिक्षक कॉलनीत सव्वा लाखाची चोरी! कुटुंब झोपले असताना चोरट्याने साधला डाव

By अनिल गवई | Updated: May 3, 2023 11:29 IST

Buldhana:स्थानिक शिक्षक कॉलनीतील एका घरातून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्याचांदीच्या मौल्यवान दागीणे असा एकुण एक लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 - अनिल गवई 

खामगाव -  स्थानिक शिक्षक कॉलनीतील एका घरातून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह सोन्याचांदीच्या मौल्यवान दागीणे असा एकुण एक लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने तपासाची चक्रे फिरवित एका संयशीतास ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी शहर पोलीसांत दाखल तक्रारीनुसार, खामगाव शहरातील शिक्षक कॉलनीत सुरक्षा रक्षक असलेल्या शिवचरण जयराम सरदार यांचे घर आहे. या घरातील सदस्य गाढ झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने बाथरूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. कपाटाचा दरवाजा तोडून रोख ४५ हजार, ६३ हजार रूपये किंमतीची गहू पोथ, पेंडाल, सोन्याची पोथ असा एकुण एक लाख १८ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी शहर पाेलीसांनी शिवचरण सरदार यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

एका संशयीतास अटकघटनास्थळी डॉग पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. या पथकाकडून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली असून एका संशयीत इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. चेतन कळसकार वय २२ रा. हरिफैल असे संयशीताचे नाव आहे. घटनास्थळी गेटवर चोरट्याने सिगारेट पिल्यानंतर फेकलेले थुटूक आढळून आले आहे. या आधारे पोलीस पुढील सुगावा लावत आहेत.

टॅग्स :theftचोरीbuldhanaबुलडाणा