शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लांजुड लघुप्रकल्पातूनही गौण खनिजाची चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:22 IST

लांजूड येथील लघू प्रकल्पाच्या सांडव्यातील हजारो ब्रास गौण खनिज चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव तालुक्यातील गौण खनिज चोरी रोखण्यात महसूल प्रशासन सपशेल अपयशी ठरत असल्याचे दिसून येते. बोरजवळा येथील तलावानंतर आता लांजूड येथील लघू प्रकल्पाच्या सांडव्यातील हजारो ब्रास गौण खनिज चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खामगाव महसूल विभागाच्या अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याने याप्रकरणी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करण्यात आली.खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून सुमारे साडेचार हजार गौण खनिजाची चोरी झाल्याचा प्रकार जून महिन्या शेवटच्या आठवड्यात उघडकीस आला. बोरजवळा येथील गौण खनिज चोरीच्या वृत्ताची शाई वाळते ना वाळते तोच, पुन्हा तालुक्यातील लांजूड लघू प्रकल्पातून हजारो ब्रास  खरप (कच्चा मुरूम)  आणि मुरूमाची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला.  खामगाव महामार्ग आणि जळगाव जामोद रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीकडून ४ जुलैच्या रात्री  हे खोदकाम करण्यात आले. खोदकामासाठी तीन पोकलेन आणि  १५ टिप्परच्या साहाय्याने ही चोरी करण्यात आली. चोरी सुरू असतानाच महसूलच्या वरिष्ठांसह इतर अधिकाºयांना माहिती देण्यात आली. मात्र, महसूल अधिकाºयांकडून कोणतीही दखल न घेण्यात आली नाही. त्यामुळे  याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. 

 स्थळ निरिक्षण आणि पंचनाम्यास विलंब! शेतसर्वे क्रमांक १५४ अ आणि १४८ ला लागून  असलेल्या  परिसरातून रात्रीच्या अंधारात हजारो गौण खनिजाची चोरी सुरू होती. त्यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि पटवारी यांना माहिती देण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. तसेच स्थळ निरिक्षण अािण पंचनामा करण्यास जाणिवपूर्वक विलंब केल्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल कण्यात आलेल्या तक्रारीत तक्रारकर्ते लक्ष्मण सनानसे यांनी  नमूद केले आहे.

 लक्षावधी रुपयांच्या रॉयल्टीला चूना!खामगाव तालुक्यातील बोरजवळा आणि पारखेड येथील   प्रकल्पातून  चोरी गेलेल्या हजारो ब्रास गौण खनिजापोटी स्वामित्व धन (रॉयल्टी) बुडाली . त्यामुळे   महसूल प्रशासनाला लक्षावधी रुपयांचा चूना लागला असला तरी,  महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचे यामुळे चांगभले होत असल्याची चर्चा आहे.

 लांजूड लघु प्रकल्पातील सांडव्यातून ४ जुलैच्या रात्री गौण खनिजाची चोरी झाली. ही वस्तुस्थिती आहे. याप्रकरणी स्थळ निरिक्षण करून पंचनामा  तहसील कार्यालयात सादर करण्यात आला आहे. - श्रीकृष्ण गोतरकरमंडळ अधिकारी, पारखेड ता. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावDamधरण