शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील चोरट्यांना आता चंदनाचा लळा; नॅशनल हायस्कूलमधील चंदनाचे झाड चोरीला

By अनिल गवई | Updated: January 18, 2023 13:42 IST

याप्रकरणी नॅशनल हायस्कूल आणि महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने खामगाव शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

खामगाव: शहरातील शैक्षणिक संस्था तसेच महाविद्यालयातील चंदनाची झाडे चोरीच्या घटना अलीकडच्या काळात वाढीस लागल्या आहेत. स्थानिक नॅशनल हायस्कूलमधील चंदनाचे झाड रात्री चोरीला गेले. ही घटना बुधवारी सकाळी उजेडात आली.

खामगाव शहरातील पंचशील होमिओपॅथीक महाविद्यालयातील तीन चंदनाची झाडे चोरीला गेल्याच्या वृत्ताची शाई वाळते ना वाळते तोच, १७ जानेवारीच्या रात्री नॅशनल हायस्कूल मधील एक चंदनाचे झाड चोरीला गेले. ही घटना बुधवारी सकाळी  उजेडात आली. याप्रकरणी नॅशनल हायस्कूल आणि महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने खामगाव शहर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

या तक्रारीच्या अनुषंगाने खामगाव शहर पोलीसांनी घटनास्थळाचे स्थळ निरिक्षण केले. यात चंदनाचा झाडाचा बुंधा कटर मशीनच्या साहाय्याने चोरून नेण्यात आल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्यामुळे गत काही दिवसांपासून भुरट्या चोरट्यासोबतच चंदन तस्करांनीही डोके वर काढल्याचे चित्र अलिकडच्या घटनांवरून दिसून येते, अशी चर्चा जनमाणसात होत आहे.

सात चंदनाची झाडे चोरीला!

पंचशील होमीओपॅथिक महाविद्यालयातील तीन, भारतीय स्टेट बँकेच्या आवारातील दोन, नॅशनल हायस्कूल आणि रायगड कॉलनीतील प्रत्येकी एक अशी सात झाडे अलिकडच्या काळातच चोरीला गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे खामगाव शहरातील चोरट्यांना आता चंदनाचा लळा लागल्याची चर्चा आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाRobberyचोरी