शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नेत्यांना गावबंदीचे लोण आता बुलढाण्यात, आरक्षण लढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा

By निलेश जोशी | Updated: October 27, 2023 18:14 IST

अन्य गावातही हाच कित्ता गिरवला जाण्याची शक्यता

नीलेश जोशी, राहेरी बुद्रूक (जि. बुलढाणा): राज्य शासनास मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यामुळे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलेले असतांनाच त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी बुद्रूक ग्रामस्थांनीही आता आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला जोवर आरक्षण मिळत नाही तोवर आमदार, खासदार तसेच पुढारी लोकांना गावबंदीचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

२७ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील फलक गावाच्या प्रवेशद्वारावर छळकावत ‘एक मराठा लाख मराठा’ च्या घोषणांनी ग्रामस्थांनी परिसर दणाणून सोडला होता. सोबतच यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर छळकवण्यात आलेल्या फलकावरच राजकारण्यांनी अकारण गावात येऊन अपमान करून घेऊ नये अशी सुचनाही ग्रामस्थांनी फलकावर लिहीलेली आहे.त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या संदर्भाने ग्रामस्थांची ही भूमिका आता चर्चेत आली आहे. येथील ग्रामस्थांची भूमिका बघता याचे लोन जिल्ह्यातील अन्य गावातही पसरण्याची शक्यता आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक गावांमध्येही यामुळे आता नेत्यांना गावबंदी केली जाऊ शकते. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारला असून या लढ्याला आता बुलढाणा जिल्ह्यातही वाढता पाठिबां मिळत आहे. राहेरी बुद्रूक गावात लोकप्रतिनिधी, नेते व त्यांच्या कार्यकर्त्याना गावबंदीचे फलक लावण्यात आले आहे. जो पर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत गावात प्रवेश नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

दरम्यान राहेरी बुद्रूक येथील ग्रामस्थ मदन देशमुख यांनी ,‘जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याच पक्षाच्या नेत्यांनी गावामध्ये येऊ नये’, असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील