शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा तालुक्यातील चौथा शिवारात मादी बिबट्याचा मृतदेह आढळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 22:14 IST

बुलढाण्याचे आरएफअेा अभिजित ठाकरे व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व मृत बिबट्याचा पंचनामा केला. 

बुलडाणा: बुलढाणा शहरातील शांतीनगरच्या मागील खोऱ्यात ८ मे रोजी बिबट्याचा कुजलेला मृतदेह आढळून आलेला असतानाच, आता तालुक्यातील चौथा शिवारात एक मादी बिबट मृतावस्थेत आढळून आले. पाडळी येथील रहिवासी अभिमन्यू भगवान डुकरे यांची चौथा शिवारातील गट क्र. 64 मध्ये शेती आहे. या ठिकाणी २९ जून रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक बिबट मुतावस्थेत असल्याची माहिती बुलढाणा वनविभागाला मिळाली. बुलढाण्याचे आरएफअेा अभिजित ठाकरे व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व मृत बिबट्याचा पंचनामा केला. 

मृत मादी बिबटाचे वय साधारणत: चार वर्षाचे आहे. पाडळी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. डी. एस. मोरे यांनी घटनास्थलीच मृत मादी बिबट्याचे शवविच्छेदन केले. सोबतच त्याच ठिकाणी बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तीन ते चार दिवसा अगोदर या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. मृत मादी बिबटाची नखे, मिश्या, दात व इतर अवयव शाबूत असल्यामुळे हा शिकारीचा प्रकार नसल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती आरएफओ अभिजीत ठाकरे यानी दिली. 

टॅग्स :leopardबिबट्याbuldhanaबुलडाणाforest departmentवनविभाग