शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराला वाहनाचा कट लागला अन् २० लाखांचा गुटखा पोलिसांच्या हाती लागला

By निलेश जोशी | Updated: November 7, 2023 19:51 IST

दुचाकीस्वार जखमी: दोन आरोपी ताब्यात

धाड (जि. बुलढाणा) : येथील बायपासवर एका वाहनाने दुचाकीस्वाराल कट मारल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मात्र वाहनातील दोघांच्या संशयास्पद हालचाली आणि वक्तव्य पहाता पोलिसांना संशय आल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यात २० लाख रुपायंचा गुटखा आढळून आला. प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना बुलढाणा न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

हा अपघात ७ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडला. मध्यप्रदेशातूनहा गुटखा येत असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. एमएच-२१-बीएच-६२९३ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाद्वारे हा गुटखा जालना येथे नेण्यात येत होता. दरम्यान ढालसावंगी येथील दुचाकीस्वार शेख इसाक शेख लुकमान (५५) हा दुचाकीस्वार रस्त्याने जात असताना धाड येथील बायपासवर त्याला एमएच-२१-बीएच-६२९३ या मालवाहू वाहनाचा कट लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार मनिष गावंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीस बुलढाणा येथे उपचारासाठी हलविले. सोबत मालवाहू वाहनातील व्यक्तींची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात हा गुटखा आढळून आला.

प्रकरणी संदीप बाजीराव मोरे (अेामसाईनगर जालना) आणि गणेश रामप्रसाद यादव (२३, रा. जालना) यांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची एक दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

वरिष्ठस्तरावर घटनेची नोंद-योगायोगाने अपघातामुळे हा २० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. त्याची पोलिस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली. मात्र मध्यप्रदेशातून बुलढाणा मार्गे थेट जालन्यात हा गुटखा नेल्यात होता. त्यामुळे प्रकरणाच्या खोलात गेल्यास गुटखा तस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरणाचा तपास एएसआय माेरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रविंद्र बऱ्हाटे, संदीप कायंदे, भास्कर लवंगे, इश्वर हाजवरे, राजू माळी, सोहेल शेख, शंकर वाघ व त्यांचे सहकारी करत आहेत.