शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी करणारे नागरिकच ठरताहेत कोरोनाचे वाहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 12:06 IST

Khamgaon News कोरोना चाचणी करण्यात येत असलेल्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे १८ मार्च रोजी दिसून आले. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच प्रमाणात कोरोना चाचणीही करण्यात येत आहे. परंतु कोरोना चाचणी करण्यात येत असलेल्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे १८ मार्च रोजी दिसून आले. खामगाव येथे उपजिल्हा सामान्य रूग्णालयात कोविड तपासणी केली जात आहे. त्याच वेळी कोरोना सुपर स्प्रेडरची ही तपासणी केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवार, बुधवार आणि गुरूवार अशी तीन दिवस तपासणी करण्यात येत आहे. परंतु शहरातील नागरिकांना कोरोना चाचणी करण्याच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, येथे सर्व कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना कोरोना चाचणी करण्यासाठी तासनतास थांबण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येतात, असेच नागरिक येथे येत आहेत.

रूग्णालयात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन नाही ! कोविड तपासणी करणाऱ्यांमध्ये अनेकांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. त्याच वेळी निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांची टक्केवारी अधिक आहे. निगेटिव्ह अहवाल येणाऱ्यांना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीपासून धोका संभवत आहे. येथे कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. कोरोना चाचणी केली जात असलेल्या ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या वतीने सुद्धा मास्कचा वापर करा, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु काही नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेही दिसून आले. तरी नागरिकांनीही कोरोना नियमांचे पालन करुन आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.  

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या