शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकाचा कार्यकाळ शेतकऱ्यांसाठी अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 15:01 IST

बाजार समित्यांचा कारभार ढेपाळल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक लूट होत आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: बुलडाणा जिल्हयातील खामगाव, मलकापूर, मोताळा व सिंदखेडराजा येथील बाजार समित्यांचा कारभार ढेपाळल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थीक लूट होत आहे.यावर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने शेतकºयांच्या तोंडातील घास काढला. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशीचे पीकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. काही शेतकºयांनी पिकांचा बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे थोड्याप्रमाणात का होईना धान्य घरात येवू शकले. सध्या बाजार समितीत सोयाबीन, ज्वारी, मक्याची आवक वाढलेली दिसून येत आहे. मात्र मलकापूर व खामगाव येथील बाजार समितीत हर्राशी करतांना व्यापाºयाकडून शेतकºयांच्या मालाची अक्षरश: थट्टा सुरु केली आहे. सद्यस्थितीत बाजार समिती प्रशासक बसविण्यात आले आहेत. मागील दहा वर्षात बाजार समितीची निवडणुक झालेली नाही. बाजार समितीत जो शेतमाल विक्रीला येतो त्यामध्ये फळ-भाजीपाला, गंगाफळ, कांदे या मालावर अडत घेण्याची तरतूद संपूर्ण आलेली आहे. तरीसुद्धा व्यापाºयाकडून मोठ्या प्रमाणात अडत आकारून व ते पावतीवर न दाखविता वरच्यावर रक्कम दाखविण्यात येवून शेतकºयांची फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. बाजार समितीत शासनाचे हमीभाव जर व्यापारी देत नसतील व हमी भावापेक्षा कमी भावामध्ये शेतकºयांचा माल घेतल्या जात असल्याचा प्रकार धक्कादायकच आहे. जिल्हाधिकारी यांनी याची दखल घेण्याची ओरड होत आहे.

खामगाव बाजार समितीत असा काही प्रकार नाही. बाजार समितीचा कारभार सुरळीत सुरु आहे. कोणालाही तक्रार असल्यास त्यांनी संपर्क साधावा. उलट आधीपेक्षा चांगला कारभार सुरु आहे. आम्ही शेतकºयांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे.- महेश कृपलानी, प्रशासक, खामगाव बाजार समिती.

आधीच दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थीक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांच्या पाठीशी अधिकाºयांनी असायला हवे. व्यापाºयांकडून होणारी आर्थीक लूट न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.- मोहन पाटील, शेतकरी नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना

बाजार समितीवर कोणाचे नियंत्रण नसल्याचा फायदा घेऊन शेतीमालाची व्यापाºयांकडून बाजार समितीत लुट होत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर रित्या कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करून बाजार समिती बंद केल्या जाईल.- अ‍ॅड.साहेबराव मोरे,शेतकरी नेते, मलकापूर

 

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती