शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दहावी पास सर्वांनाच मिळणार अकरावीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:31 IST

सीईटी होईल की नाही, अकरावीत प्रवेश कसा मिळेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दहावीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी ...

सीईटी होईल की नाही, अकरावीत प्रवेश कसा मिळेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दहावीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अकरावी प्रवेशाच्या हालचाली दिसत नाहीत. अकरावी प्रवेशासाठी शासनाने सीईटी परीक्षाघेण्याचे जाहीर केले. परंतु दोन दिवसांतच सीईटीची वेबसाइट बंद केली, त्याचे कारणही समजू शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम वाढला आहे. अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होतील की सीईटी परीक्षेच्या माध्यमातून होतील. याविषयीची कोणतीच कल्पना विद्यार्थ्यांना नाही. यंदा बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ९९.९८ टक्के लागला आहे. सर्वांनाच अकरावी प्रवेशाची घाई झाली आहे. परंतु सीईटीची वेबसाइट बंद आहे.

सीईटी वेबसाइट हँग

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश प्रक्रिया (सीईटी) परीक्षा २१ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.

दहावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्याना ऑनलाइन पद्धतीने http://cet.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची सुविधा मंडळामार्फत २० जुलैपासून ते २६ जुलैपर्यंत उपलब्ध करून दिली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव संकेतस्थळ तूर्त बंद करण्यात आले आहे.

परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्याच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.

सीईटी तयारी कशी कराल?

दहावीची परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्‍नावर असते. परंतु सीईटी परीक्षा ही पर्यायी प्रश्‍नांवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावीच्या अभ्यासक्रमाची तयारी करावी. पर्यायी प्रश्‍नांची तयारी करावी. परीक्षेचा धसका घेऊ नये. कारण, ही अकरावी प्रवेशासाठी परीक्षा आहे. यापुढील सर्व परीक्षा पर्यायी प्रश्‍नांवर आधारित असल्याने विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेचा फायदाच होईल, असे मत शिक्षणतज्ज्ञांमधून व्यक्त होत आहे.

दहावी पास विद्यार्थी - ३८४१५

अकरावीसाठी एकूण जागा - ४४०००