शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

मंडप व्यावसायिकांचे ३० कोटींचे अर्थकारण बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:52 IST

यंदा लग्न सराईनंतर गणेशोत्सवाचा सिजनही वाया गेल्यामुळे या व्यवसायाचे अर्थकारण डबघाईस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोना संसर्गामुळे गणेशोत्सावर संक्रात आल्यामुळे जिल्ह्यातील मंडप व्यावसायिकांनाही कोट्यवधीचा फटका बसत असून बाजारपेठेतही मुंबईवरून लाईटींगसह सजावटीच्या साहित्याची कमतरता असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, वर्षाकाठी जिल्ह्यात एका अंदाजानुसार जवळपास ३० कोटींपेक्षाही अधिक उलाढल होत असते. मात्र यंदा लग्न सराईनंतर गणेशोत्सवाचा सिजनही वाया गेल्यामुळे या व्यवसायाचे अर्थकारण डबघाईस आले आहे.जिल्ह्यात दरवर्षी ९७३ ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केल्या जातो. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान एका मंडप व्यावसायिकाची दोन ते अडीच लाख रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र यंदा ती पुर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे मंडप व्यावसायिकांचे सजावटीचे साहित्य, स्टेज, लाईटींग, साऊंड सिस्टीमही सध्या गोडावूनमध्येच पडून आहे. दरम्यान, लग्न सराई व गणेशोत्सवाचा महत्त्वाचा सिजनच हातचा गेल्याने काही मंडप व्यावसायिकांना त्यांच्याकडील फिक्स डिपॉजिटच मोडण्याची वेळ आली आहे. एका व्यावसायिकाने चक्क त्याची ही आपबिती बोलून दाखवली. जिल्ह्यात छोटे-मोठे मिळून जवळपास १,२०० च्या आसपास मंडप व्यावसायिक असून संघटनेमध्ये ३०० च्या आसपास व्यावसायिक सक्रीय आहेत. तर या व्यवसायावर काम करणारे जिल्ह्यात सुमारे चार हजार मजूर कार्यरत आहेत. त्यांच्या समोरही यामुळे संकट उभे ठाकले आहे. आता मिशीन बिगीन अगेनअंतर्गत प्रत्यक्षात सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध कधी उठतात याकडे नजरा आहेत.

लग्न सराईत जवळपास पाच ते सहा लाखांचा तर गणेशोत्सवादरम्यान दोन ते अडीच लाख रुपायंची उलाढल ठप्प झाली आहे. परिणामी जवळ जे आहे त्यातच दैनंदिन गरजा सध्या भागवत आहोत.- गजानन देशपांडे,मंडप व्यावसायिक, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकbusinessव्यवसाय