शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकास मारहाण करणाऱ्यास दहा हजार रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 15:35 IST

जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक ऐ. ढुमणे यांनी आरोपीस दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

बुलडाणा: एसटी बस चालकास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस दहा हजार रुपये दंडाची शिक्षा १५ फेब्रुवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. शेलगाव आटोळ येथे ६ आॅक्टोबर २०१७ रोजी ही घटना घडली होती.चिखली आगारातील बसचालक विनोद दत्तू वरपे व वाहक वैशाली गायकवाड हे ६ आॅक्टोबर २०१७ रोजी चिखली येथून अंचरवाडी येथे एसटी बस (क्रमांक एम-एच-४०-एन-९६९१) घेऊन जात होते. शेलगाव आटोळ येथे बसमध्ये निवृत्ती सुभाष पवार या प्रवाशाने गोंधळ घातला. बसचालकाने हटकले असता, निवृत्ती पवार याने चालकास मारहाण केली. याप्रकरणी बसचालक विनोद वरपे यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपी निवृत्ती पवार (रा. शेलगाव आटोळ) विरूद्ध गुन्हा दाखल केला. चौकशीअंती आरोपी निवृत्ती पवार याच्याविरूद्ध दोष निश्चित केला. पुढे हे प्रकरण पुराव्यासाठी वि. न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयामध्ये आले. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोक ऐ. ढुमणे यांनी आरोपीस दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास चार महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकिल अ‍ॅड. एस. पी. हिवाळे यांनी बाजू मांडली. त्यांना तपासअधिकारी पोलीस हेड काँस्टेबल शेळके यांनी सहकार्य केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCourtन्यायालय