शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
महाराष्ट्रात ३४ हजार कोटींची गुंतवणूक; ३३ हजार रोजगार
4
फडणवीसांचे सरकार पाडण्यासाठी अजित पवारांचे नेते सामील, लक्ष्मण हाके यांचा आरोप
5
मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे हाल; गाडीतच स्वयंपाक, तिथेच जेवण
6
आंदोलनादरम्यान, पोलिसांच्या मदतीला पाऊस आला धावून...
7
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
8
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
9
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
10
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
13
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
14
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
15
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
16
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
18
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
19
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
20
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या

तहसील कार्यालयाने सुधारित याद्या बँकेत केल्या सादर!

By admin | Updated: May 22, 2017 00:38 IST

१४ कोटींचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तहसील कार्यालयाच्या गैरकारभारामुळे चुकीच्या याद्या भारतीय स्टेट बँक शाखा लोणार येथे सादर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऐन पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाअभावी पेरणी लांबणीवर टाकावी लागणार होती. यावर ‘लोकमत’ने वृत्त्त प्रकाशित करताच तहसील कार्यालयाने सुधारित याद्या बँकेत सादर केल्या. सन २०१६ - १७ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा उतरविला नव्हता, अशा शेतकऱ्यांना सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती. परंतु, लोणार तहसील कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे चुकीच्या याद्या भारतीय स्टेट बँक शाखा लोणार येथे सादर करण्यात आल्या. परिणामी ऐन पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाअभावी पेरणी लांबणीवर टाकावी लागणार असल्याचे वृत ‘लोकमत’ मध्ये १२ मे रोजी प्रकाशित होताच तहसील कार्यालयाने सुधारित याद्या बँकेत सादर केल्या व १४ कोटी पीक विमा अनुदानाची रक्कम ऐनवेळवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली.सतत चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने सन २०१६-२०१७ साली ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही, अशा शेतकऱ्यांनासुद्धा शासन स्तरावरून पेरणीसाठी मदत व्हावी, या प्रमुख उद्देशाने शेतकऱ्यांसाठी सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला लोणार तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती. त्यानुषंगाने लोणार तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांच्या याद्या भारतीय स्टेट बँकेत सादर केल्या. सदर याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर चुकीचे खाते नंबर, अर्धवट खाते नंबर अशा त्रुटी असल्यामुळे बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक अनुदानाची रक्कम टाकू शकले नाही. याबाबतचा जाब शेतकरी तहसील कार्यालयाच्या तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना विचारू लागले असता बँकेत याद्या दिल्या आहेत. परंतु, बँकेने अजून खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली नाही, असे सांगून वेळ मारून नेत होते. मात्र लोकमतच्या वृत्त्तानंतर सुधारित याद्या बँकेकडे सादर करण्यात आल्या.