शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

By admin | Updated: July 10, 2014 01:33 IST

उंद्री येथील शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल

उंद्री : येथील शहाजी राजे विद्यालयातील शिक्षकाने काल रात्रीच्या सुमारास शाळेतच विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज ९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक अनंता चेके व अवचार यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खामगाव तालुक्यातील गेरु माटरगाव येथील रहिवासी शिक्षक अशोक रावसिंग साबळे (वय ३१) हे येथील शहाजी राजे विद्यालयात कार्यरत होते. तर त्यानंतर त्यांना व्दारकाबाई खेडेकर प्राथमिक शाळा उंद्री येथे पाठविण्यात आले होते. त्यानंतर गेल्या ३ ते ४ महिन्यापासून ते कार्यरत नव्हते. दरम्यान काल ९ जुलै रोजी रात्री शिक्षक अशोक रावसिंग साबळे यांनी विषारी औषध प्राशन करुन शहाजी राजे विद्यालयाच्या प्रांगणात आत्महत्या केली. नित्या प्रमाणे आज सकाळी विद्यार्थी शाळेत आले असता अशोक साबळे यांचा मृतदेह विद्यार्थ्यांना दिसून आला. याबाबत त्यांनी शिक्षकांना माहिती दिल्यानं तर पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला असता मृतकाचे खिशात चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये संस्थेने शाळेवर रुजू करुन घेण्याबाबत फसवणूक केल्याने आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे. याप्रकरणी प्रदीप भजनसिंग मछले (वय २४) यांनी अमडापूर पो.स्टे.ला फिर्याद दिली असून पोलिसांनी मुख्याध्यापक अनंता चेके व अवचार यांच्याविरूध्द भादंवि ३0६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदर शिक्षकाला तीन महिण्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटीवर नियुक्ती दिली होती, तथापि निर्धारीत वेळेत प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांची सेवा आपोआप खंडीत झाली, यात संस्थेचा कोणताही दोष नाही असे संस्थेच्या सचिवांनी सांगीतले.