खामगाव, दि. ३१- पोलीस असल्याचा बनाव करून दोघा भामट्यांनी सेवानवृत्त शिक्षिकेचे दीड लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी शहरातील डीपी रोड भागात घडली. येथील नगर परिषद शाळेच्या सेवानवृत्त शिक्षिका लक्ष्मीबाई भालचंद्र काळकर (वय ७0) या शुक्रवारी सकाळी ८.३0 वा. दरम्यान डीपी रोडवरून घराकडे जात असताना दुचाकीस्वार दोघांनी त्यांना आवाज देत थांबविले व पोलीस असल्याची बतावणी करून ह्यशहरात चोर्या होत आहेत. आपले दागिने सांभाळून ठेवाह्ण असे म्हणून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेत एका कागदात गुंडाळून पर्समध्ये ठेवत असल्याचे भासवत दागिने लंपास केले. काळकर या घरी गेल्या असता त्यांना पर्समध्ये दागिने दिसून आले नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षिकेचे दागिने पळविले!
By admin | Updated: April 1, 2017 02:19 IST