शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Teacher's Day Special : आयुष्य घडविणाऱ्या शिक्षकांच्या आठवणींचा अनमोल ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:19 IST

आयुष्य घडविणाºया शिक्षकांच्या आठवणींचा अनमोल ठेवा आजही मनाच्या एका कप्प्यात जपलेला आहे.

- ब्रह्मानंद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आयुष्य घडविणाºया शिक्षकांच्या आठवणींचा अनमोल ठेवा आजही मनाच्या एका कप्प्यात जपलेला आहे. आज जे काही यश मिळविले आहे, त्या यशामागे शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी शिक्षकांचा गौरव केला.इंग्रजीचा पाया असा झाला पक्कामला भुगोल हा विषय आवडायचा. माझे आवडीचे शिक्षक सुलेखा बेगम व परनीकुमार. सुलेखा बेगम ह्या मॅडम आम्हाला इंग्रजी विषय शिकवायच्या. ह्या शिक्षकांनी जसा इंग्रजीचा पाया भक्कम केला होता, त्यामुळे आयुष्यात इंग्रजी विषयाचे अनेक फायदे समोर होत गेले. तसे माझे दहावी पर्यंतचे शिक्षण तामीळनाडु राज्यातील सेलम येथील श्री विद्यामंदिर येथे झाले.

आज जे काही आहे, ते शिक्षकांमुळेच!अभ्यासात कितीही हुशार असले, तरी त्या योग्य मार्गदर्शन मिळाले नाही, तर त्याला यश मिळविणेही कठीण आहे. आपण आयुष्यात खूप काही मिळवितो, त्या पाठीशी काही प्रसंग असतात. मी सुद्धा अभ्यासात हुशार होतो, पण शिक्षकांनीच योग्य मार्गदर्शन दिल्याने जीवनाला एक दिशा मिळाली.तामीळनाडू राज्यातील सेलीम येथे माझे शिक्षण झाले. तिथे माझ्या आयुष्याला आकार देणारे वनस्पतीशास्त्र (बॉटनी) विषय शिकविणारे शिक्षक परनीकुमार भेटले. त्यांची महाविद्यालयीन जीवनापासून पुन्हा भेटच झाली नाही.

तो प्रसंग आजही न विसरता येणारा...दहावीचे शिक्षण घेत असताना मी नोटीस बोर्डवर माझी परीक्षेतील रँक शोधत होतो. तेंव्हा माझ्या बाजुला माझे शिक्षकही उभे होते. परंतू मी चौदाव्या ते पंधराव्या रँकमध्ये होतो. तेंव्हा बाजुला असलेले शिक्षक मला म्हणाले की, ‘तू कितव्या रँकमध्ये आहेस,’ मी त्यांना माझा रँक सांगितल्यानंतर ते शिक्षकांनी माझ्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या.

अन् जीवनाला कलाटणी मिळाली...दहावीमध्ये शाळेतून प्रथम व जिल्ह्यातून दुसरा क्रमांक मिळवला. एक दिवस शिक्षकांनी प्रोत्साहन देऊन तुझ्याकडून मोठ्या यशाची अपेक्षा असल्याने मला बोलून दाखवले. तेंव्हापासून आयुष्याला एक वेगळी कलाटनी मिळाली. सुरूवातीला रिझर्र्व्ह बँकेमध्ये नोकरी मिळविली. रिझर्व्ह बँकेत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर जिल्हा परिषद सीईओ आणि आता बुलडाणा जिल्हाधिकारी पदापर्यंतचे यश मिळविता आले आहे.

शालेय, महाविद्यालयीन जीवनात शैक्षणिक प्रगती चांगली असल्याने शिक्षकांकडून कौतूक झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आयुष्यात चांगला हुद्दा मिळविण्याची जिद्द निर्माण झाली.          

 - षण्मुगराजन एस.

 

 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनbuldhanaबुलडाणा