शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 13:40 IST

अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

- संदीप वानखडे  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गत सात ते आठ वर्षांपासून शिक्षक भरतीच होत नसल्याने विद्यार्थ्यांनी डिएलएडकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. गत तीन वर्षापासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा विद्यार्थी मिळत नसल्याने रिक्त राहत आहेत. त्यामुळे, अनेक विनाअनुदानीत अध्यापक विद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.राज्य सरकारगणीक शिक्षक भरतीचे नियम व निकष बदलत आहेत. सन २०१३ नंतर शिक्षक भरतीच होत नसल्याने १२वीनंतर डिएलएडकडे विद्यार्थ्यांनी गत काही वर्षांपासून पाठ फिरवली आहे. विना अनुदानीत अध्यापक विद्यालयांना मोठ्या प्रमाणात परवारनगी देण्यात आली. त्यामुळे तालुकास्तरापर्यंत अध्यापक विद्यालय थापन झाले. काही वर्षांनी शिक्षक भरतीच बंद झाल्याने विद्यार्थी अध्यापक विद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रवेशच घेत नसल्याचे चित्र आहे. यावर्षी जिल्ह्यात १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यातही शासकीय डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे, आता केवळ अनुदानीत आणि विनाअनुदानीत डीएलएड महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्यात येत आहे. दोन अनुदानीत आणि २६ विना अनुदानीत अध्यापक विद्यलयासाठी ही प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. गत काही वर्षांपासून अर्ध्यापेक्षा जास्त जागा रिक्त राहत आहेत. तर काही अध्यापक विद्यालयांना विद्यार्थीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, हे अध्यापक विद्यालये बंद पडून तेथील कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. डीएलएड केल्यानंतर टीईटी आणि त्यानंतर टेट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे निकष शिक्षक होण्यासाठी युती सरकारने ठरविले होते.

डीएलएड केल्यानंतर सीईटी, टेट परीक्षा उत्तीर्ण करावे लागते. नोकरीची हमी नसल्याने विद्यार्थी संख्या घटली आहे. बुलडाणा जिल्ह्यात दरवर्षी १८०० जागांसाठी प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येते. मात्र, केवळ ४८ टक्के जागा भरल्या जातात. उर्वरीत ५२ टक्के जागा रिक्त राहत आहेत.- विजयकुमार शिंदे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, बुलडाणा

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाEducation Sectorशिक्षण क्षेत्र