शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

श्रमदानाचे श्रमसाफल्य...शेततळ्यात साकारला गेला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 18:16 IST

तन्मयतेने एखादे कार्य केले की, निसर्गही त्या सकारात्मकतेला जोड देतो, असाच काहीसा प्रत्यय जस्तगाववासीयांना येत आहे. जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरीत्या साकारला गेला आहे.

- श्याम देशमुखपातुर्डा :  तन्मयतेने एखादे कार्य केले की, निसर्गही त्या सकारात्मकतेला जोड देतो, असाच काहीसा प्रत्यय जस्तगाववासीयांना येत आहे. जस्तगाव ता. संग्रामपूर येथे नुकत्याच झालेल्या जलसंधारणाच्या शेततळ्यात राष्ट्रध्वजाचा तिरंगा नैसर्गिकरीत्या साकारला गेला आहे. जणू काही जलसंधारणांच्या कामांनी प्रसन्न होऊन भारतमाता आशीर्वाद देत आहे. रणरणत्या उन्हात जस्तगाव वासियांनी केलेल्या श्रमदानाचे श्रमसाफल्य अशा स्वरूपात दिसल्याने ही एक आगळीवेगळी घटना ठरली.यावर्षी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जस्तगावातील नागरिकांनी मोठ्या हिरिरीने सहभाग घेतला. रणरणत्या उन्हात व रात्री १ वाजेपर्यंत प्रचंड श्रमदान करून गावात पाणी साठवणुकीसाठी शेततळे, बांध खोदून ठेवले. यापैकी येथील गजानन शालीग्राम डोसे यांच्या गावालगतच्या शेतातील शेततळे पहिल्या दमदार पावसात प्रसिद्धीच्या झोतात आले. जस्तगाव शिवारात गावालगत गट नं. ८२ मध्ये गजानन डोसे यांचे पाच एकर शेत आहे. या शेतात जस्तगाववासीयांनी एप्रिलमध्ये श्रमदान करून १५ बाय १५ आकाराचे शेततळे श्रमदानातून खोदले.अवघ्या तीन दिवसात हे शेततळे खोदून पूर्ण झाले. परिसरात ८ व ९ जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावली. कुबेराने प्रसन्न होऊन दान रिचवावे, असा पाऊस पडला. जलसंधारणाची प्रतीक्षा फळाला आली. सर्वच शेततळी भरून निघाली यातील एका शेततळ्यात निसर्गाच्या अनोख्या रूपाचे विहंगम दृष्य साकारले गेले. शेततळ्यात पाणी साचल्याने तळातील शेवाळ वर पृष्ठभागावर तरंगला. या हिरव्या रंगाला मधोमध पांढ-या रंगाची साथ मिळाली. शेततळ्याच्या दुस-या बाजूची छाया पृष्ठभागावर पडल्याने केशरी रंग तयार झाला अक्षरश: तिरंगा शेततळ्यात साकारला गेला.तिरंगा हा आपल्या राष्ट्रध्वजाचा रंग यातून स्पष्ट दिसू लागल्याने जलसंधारणाच्या कामांनी निसर्ग प्रसन्न झाल्याचा आभास निर्माण झाला. काम तन्मयतेने, सकारात्मकतेने केल्यास त्याचे परिणामही सकारात्मक दिसून येतात. हा सृष्टीचा नियम याठिकाणी तंतोतंत लागु पडला. निसर्गाच्या या मनोहारी रूपाने निसर्गप्रेमी आनंदून गेले. 

गावक-यांनी वॉटर कप स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. गजानन डोसे यांच्या शेतातील तळ्यात तिरंगा रंग नैसर्गिकरीत्या साकारला गेला. जलसंधारणाच्या कामांना निसर्गही प्रसन्न झाला आहे. ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. आम्ही हा निसर्गाचा आशीर्वाद समजतो.- योगेश डोसे,गावकरी (उपसरपंच), जस्तगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणा