शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

 'अपाम' योजनेंतर्गत  बँकाना अडीच हजार कर्ज प्रकरणांचे ‘टार्गेट’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 5:55 PM

अपामच्या कर्ज योजनेचे जिल्ह्यातील बँकाना अडीच हजार प्रकरणांचे टार्गेट देण्यात आले असून ते टार्गेट पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांना परत पाठविता येणार नाही. त्यामुळे कर्ज नाकारणाऱ्या बँकाना चाप बसला असून अपामच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परतावा योजनेसाठी लाभार्थ्यांना बँकामध्ये वारंवार नकारघंटाच ऐकायला मिळत होती. त्यामुळे वैयक्तीक कर्ज व्याज परतावा किंवा गट कर्ज व्याज परतावा योजनेचे अनेक प्रस्ताव प्रलंबीत होते. परंतू आता अपामच्या कर्ज योजनेचे जिल्ह्यातील बँकाना अडीच हजार प्रकरणांचे टार्गेट देण्यात आले असून ते टार्गेट पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्यांना परत पाठविता येणार नाही. त्यामुळे कर्ज नाकारणाऱ्या बँकाना चाप बसला असून अपामच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  सुशिक्षित बेरोजगारांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला करणे, त्यांच्यासाठी स्वयंरोजगाराच्या योजना राबवून त्यात येणाºया अडचणी दूर करणे, या उद्देशाने सुरू केलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचा बँकाच्या नियमांपुढे टिकाव न लागल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचीत राहत होते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महमंडळाकडून वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार ४१ अर्ज आले आहेत, त्यापैकी ३०५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये प्रलंबीत राहणाºया प्रकरणांची संख्या सर्वाधिक दिसून येते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कर्ज प्रकरण म्हटले की बँकाही नाक मुरडत असून, कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे प्रकार समोर आले. त्यामुळे आता या योजनेंतर्गत कर्ज प्रकरणांचे बँकाना टार्गेट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील २१ बँकाना २ हजार ५०० प्रकरणांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यापुढे लाभार्थ्यांना बँक कर्ज प्रकरणासाठी माघारी परतवून लाऊ शकरणार नाहीत. जिल्ह्यात कर्ज प्रकरणांचा हा आकडा आता फुगणार असल्याचे संकेत आहेत. 

असे आहे बँक निहाय उद्दिष्टजिल्ह्यात अडीच हजार प्रकरणांचे बँकाना उद्दिष्ट आहे. त्यामध्ये अलाहाबाद बँक १६, आंध्र बँक १६, बँक आॅफ बडोदा २४, बँक आॅफ इंडीया ११२, बँक आॅफ महाराष्ट्र २९६, सेंट्रल बँक ४८, सेंट्रल बँक आॅफ इंडीया २६२, देना बँक १६, आयडीबीआय ५८, इंडीयन ओव्हरसीस बँक ७४, ओरीएंटल बँक आॅफ कॉमर्स १६, पंजाब नॅशनल बँक ३२, स्टेट बँक ६२४, सिंडिकेट बँक १६, युको बँक ३२, युनियन बँक ३२, विदर्भ कोकण ग्रामीण बँक ३६४, एक्सिस बँक ८०, एचडीएफसी १४८, आयसीआयसीआय १०४ व बीडीसीसी बँकेला १३० प्रकरणांचे उदिष्ट आहे. 

बँकाना १५ फेब्रुवारीची डेडलाईनअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना प्रभाविपणे जिल्ह्यात राबविण्यासाठी वेळोवेळी अनेक बैठकी घेण्यात आल्या आहेत. परंतू बँक व्यवस्थापक या योजनेअंतर्गतचे कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवणे, कर्ज प्रकरणे घेण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार वाढले होते. तेंव्हा बँकेकडे महामंडळाची असलेली प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी बँकाना १५ फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली आहे. 

बँकेकडे महामंडळाची असलेली प्रलंबित प्रकरणे निकाली काढुन किंवा प्रकरणे प्रलंबित असल्याच्या योग्य कारणासह बँकाना आपला खुलासा मागविण्यात आला आहे. ही माहिती १५ फेब्रुवारीपर्यंत सादर करावी लागणार आहे. - डॉ. निरुपमा डांगे, जिल्हाधिकारी, बुलडाणा. 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना बँक कर्ज देण्यास नकार देऊ शकत नाहीत. लाभार्थी महामंडळाच्या नियमात बसत असेल तर त्याला या योजनेचा लाभ नक्कीच मिळेल. बँकानीही लाभार्थ्यांना माघारी पाठवू नये. -नीलेश शिंदे, जिल्हा समन्वयक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, बुलडाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाbankबँक