शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अंढेरा परिसरात पावसाळ्यात टँकरने पाणी पुरवठा

By ram.deshpande | Updated: July 26, 2017 01:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गावांना गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अजूनही दमदार ...

ठळक मुद्देधरणे कोरडीच : गावक-यांवर पाणीटंचाईचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटला असला, तरी देऊळगाव राजा तालुक्यातील पाच गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम असून, टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.परिसरातील अंढेरा, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, धोत्रा नंदई, नागनगाव या गावांना गेल्या २ ते ३ वर्षांपासून दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने जमिनीतील जलसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाणीटंचाईचे संकट कायम आहे. अंढेरा, शिवणी आरमाळ, मेंडगाव येथील धरणात आतापर्यंत जलसाठ्यात वाढ झाली नसून, सदर धरणात आतापर्यंत शून्य मृतसाठा आहे, तसेच परिसरातील पाझर तलावसुद्धा कोरडेच आहे.शिवणी आरमाळ येथून परिसरातील अनेक गावांना पाणीपुरवठा होतो; परंतु धरणात पाणी नसल्यामुळे ग्रामपंचायतच्या अनेक योजना ठप्प पडल्या आहेत. अंढेरासह परिसरात पाटाचे पाणी येत असल्याने यावर्षी रब्बी पिकांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. रब्बी पिकांना नगदी पिके म्हणून पाहिली जातात; परंतु पाणीच नसेल तर शेतकºयांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.परिसरातील अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, पाडळी शिंदे, पिंप्री आंधळे, धोत्रा नंदई, सावखेड नागरे या गावांमध्ये आतापर्यंत सर्वसाधारण पाऊस झाल्याने तूर, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग ही खरिपाची पिके चांगली आहेत. आतापर्यंत परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.या गावांना होतो टँंकरने पाणी पुरवठाअंढेरा गावासह परिसरातील पाडळी शिंदे, धोत्रा नंदई, नागणगाव या गावांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जुलै महिना संपण्याच्या मार्गावर असून, परिसरात आतापर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने या भागातील विहिरी, धरण, पाझर तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यातच परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने शिवणी आरमाळ, अंढेरा, मेंडगाव येथील धरणात पाणी नसल्याने हे प्रकल्प कोरडेच आहेत. येथून गावांना पाणीपुरवठा करण्यात योजना पाण्याअभावी बंद आहेत. जनावरांनासुद्धा पाण्यासाठी भटकंती करावी लागते.