शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

तालुका कृषी अधिका-यांची आमदाराकडून कानउघडणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:35 AM

शेगाव(जि.बुलडाणा): तालुक्यातील भोनगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरीसुद्धा हे गाव जलयुक्त शिवार योजनेत का टाकले नाही, यावरून आ. आकाश फुंडकर यांनी तालुका कृषी अधिकारी ढाकणे यांची चांगलीच कानउघाडणी केली. ड्युटी करायची इच्छा नसेल तर काम सोडून द्या, असा दमही आमदारांनी त्यांना दिला. याशिवाय खामगाव तालुक्यातील १२५ बंधाºयांचा आराखडा सादर न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. एकंदरीत शेतीचे प्रश्न, जलसिंचन, पिण्याचे पाणी आदीवरून १७ मार्च रोजी पार पडलेली आमसभा चांगलीच गाजली. 

ठळक मुद्देशेगाव पंचायत समिती आमसभेत पाणीटंचाई शेतीच्या प्रश्नावर गदारोळ

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव(जि.बुलडाणा): तालुक्यातील भोनगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरीसुद्धा हे गाव जलयुक्त शिवार योजनेत का टाकले नाही, यावरून आ. आकाश फुंडकर यांनी तालुका कृषी अधिकारी ढाकणे यांची चांगलीच कानउघाडणी केली. ड्युटी करायची इच्छा नसेल तर काम सोडून द्या, असा दमही आमदारांनी त्यांना दिला. याशिवाय खामगाव तालुक्यातील १२५ बंधाºयांचा आराखडा सादर न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. एकंदरीत शेतीचे प्रश्न, जलसिंचन, पिण्याचे पाणी आदीवरून १७ मार्च रोजी पार पडलेली आमसभा चांगलीच गाजली. पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार २०१७-१८ चा सरपंच मेळावा व वार्षिक आमसभा १७ मार्च रोजी घेण्यात आली. याप्रसंगी सध्याची पाणीटंचाई ही निसर्गनिर्मित असून, त्याला सर्व मिळून एकत्रितपणे सामोरे जाऊ, असे आवाहन आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी सरपंचांना केले. शेगाव तालुक्यातील सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व सभापती विठ्ठल पाटील, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार गणेश पवार यांची मंचकावर उपस्थिती होती. तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे प.सं.चे सर्व विभागाचे अधिकारी, महावितरण, तालुका कृषी विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी या सभेला उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर बीडीओ श्रीकृष्ण सावळे यांनी पं.स. अंतर्गत सर्व विभागांचा अहवाल सादर केला. त्यानंतर आमसभेला उपस्थित सरपंचांनी आपल्या गावातील समस्या सभेत मांडल्या. आ. फुंडकर यांनी अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या सभेत पाणीटंचाईबाबत जास्त समस्या मांडण्यात आल्या. चिंचोली, मनसगाव, कुरखेड, भोनगाव, पाडसूळ, सवर्णा, माटरगांव, निंबी इत्यादी गावातील विविध समस्या याठिकाणी मांडण्यात आल्या. संबंधित अधिकाºयांनी त्यावर उपाययोजना सुचवल्या. ग्रामीण परिसरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून १६ मार्च २०१८ रोजी महसूल विभागाला प्राप्त झाले असून, शासन परिपत्रकाचे वाचन सर्व सरपंचांनी आपल्या गावातील ग्रामसभेत करावे, अशी सूचना उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी आमसभेत दिली.पाणीटंचाईच्या उपाययोजना तातडीने राबवाजर कोणीही पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई करेल तर त्यांना शासन होईल, हे लक्षात ठेवावे. अशावेळी जनतेसाठी काहीही करू असे ते म्हणाले. पक्षभेद बाजूला ठेवून पाणीटंचाईचा सामना करावा असे आवाहन त्यांनी सभेला उपस्थित विरोधी पक्षाच्या सरपंचांना केले. तालुक्यातील आरओ प्लांट बंद पडले आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतीने विद्युत बिल व आरओचे मेंटनन्स करण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी सूचनाही त्यांनी केली. मनसगाव येथे पाण्याचे स्रोतच नसल्यामुळे दुसरी काही उपाययोजना करावी, अशी सूचना आ. आकाश फुंडकर यांनी केली.  ग्रा.पं. सदस्य साजिद यांच्यासोबत शाब्दिक चकमकमनसगाव येथील आरओ प्लान्ट बंद असल्याच्या कारणावरून आ. फुंडकर व ग्रा.पं.सदस्य सै. साजिद यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी लोकप्रतिनिधी कामे करीत नसल्याचा आरोप लावणाºया साजिद यांना त्यांच्या गावातील आरओ मशीन कोणत्या कंपनीने बसविली, हे वेळेवर सांगता आले नाही. त्यावरून आ. फुंडकर यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली. त्यानंतर आपल्या भाषणातून आ. फुंडकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. 

आ. कुटेंची अनुपस्थितीया सभेला आ.डॉ. संजय कुटे हे अनुपस्थित होते. त्यामुळे कुटे यांच्या मतदारसंघातील  विरोधी पक्षाच्या सरपंचांनी आ. कुटे यांच्या विरोधात बोलून चांगलेच तोंडसुख घेतले. सभेला आ. कुटे हजर राहत नाहीत आणि त्यामुळे आमच्या गावांचा विकास होत नाही, असा आरोप यावेळी काही सरपंचांनी केला. आ. कुटे जरी आले नसले तरी त्यांच्या गावांची कामे होणार नाहीत, असे होणार नसल्याचे सांगून आ. फुंडकर यांनी कुटे हे काही कामामुळे येऊ शकले नाहीत, असे सांगून वेळ मारून नेली.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा