शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

काळय़ा फिती लावून कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 01:31 IST

बुलडाणा : १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत रुजू होणार्‍या  कर्मचार्‍यांसाठी डीसीपीएस योजना लागू करुन जुनी पेन्शन  योजना बंद केल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन ह क्क संघटनेच्या कर्मचार्‍यांनी बुधवारी काळ्या फिती लावून  जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निषेध नोंदवून दैनंदिन कामकाज  केले. 

ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेच्या कर्मचार्‍यांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत रुजू होणार्‍या  कर्मचार्‍यांसाठी डीसीपीएस योजना लागू करुन जुनी पेन्शन  योजना बंद केल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन ह क्क संघटनेच्या कर्मचार्‍यांनी बुधवारी काळ्या फिती लावून  जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निषेध नोंदवून दैनंदिन कामकाज  केले. शासन सेवेत आलेल्या कर्मचार्‍यासाठी शासनाने ३१ ऑक्टोबर  २00५  रोजी शासन निर्णय काढून १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत  रूजू होणार्‍या कर्मचार्‍यांकरिता डीसीपीएस योजना लागू केली,  तसेच जुनी पेन्शन योजना बंद केल्याचा निषेध करण्याकरिता १  नोव्हेंबर २0१७ रोजी जिल्ह्यातील सर्व कर्मचार्‍यांनी काळ्या फि त लावून काम केले. डीसीपीएस या अन्यायकारी योजनेचा निषेध  म्हणून निषेध दिन पाळण्यात आला. यावेळी कर्मचार्‍यांनी डीसी पीएस योजनेमुळे कर्मचार्‍यांमध्ये नवे व जुने असा भेद शासनाने  निर्माण केल्याचा व समान काम, समान वेतन या धर्तीवर समान  काम, समान पेन्शनचा नारा देऊन जुनी पेन्शन योजना लागू  करण्याची मागणी केली. अन्यायकारी डीसीपीएस योजनेस विरोध म्हणून अमरावती  विभाग महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन निषेध दिन संपूर्ण  विभागात पाळण्यात आला. त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यात  महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन  बुलडाणा यांच्याकडून  जिल्हाभर यशस्वीरीत्या सदर आंदोलन राबविण्यात आले. या  आंदोलनात कर्मचार्‍यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला.

खामगाव : वरिष्ठ व निवड श्रेणीबाबत शासन निर्णयाचा  शिक्षकांनी केला निषेधवरिष्ठ व निवड श्रेणीबाबत २३ ऑक्टोबरला शिक्षण विभागाने  काढलेल्या जीआरचा निषेध खामगाव व परिसरातील शाळांमध्ये  शिक्षकांकडून काळ्या फिती लावून महाराष्ट्र राज्य शिक्षक  परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला.गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभाग, चित्र-विचित्र प्रयोग  करत असून, शिक्षकांचे शिकवणे कमी व बाबुगिरीचेच काम  अधिक सुरू आहे. याला कारण शासन व त्यांचा शिक्षण विभाग  असून, याचे परिणाम स्वरूप शिक्षणाचा दर्जा अधिक खालावत  आहे. त्यातच शिक्षकांचे मानसिकरीत्या खच्चीकरण करण्याचे  काम शासनाद्वारे सुरू आहे. २३ ऑक्टोबरला वरिष्ठ व निवड  श्रेणीबाबत काढलेला जी.आर. अन्यायकारक आहे. या  जीआरमधील क्र.४ ही अट असंवैधानिक असून, १९८१ मधील  अनुसूची क चे उल्लंघन करणारी आहे. या बाबतची कायदेशीर  तरतूद असल्याने या तरतुदीला डावलण्याचा अधिकार शिक्षण  विभागाला नाही. त्यामुळेच ही अन्यायकारक तरतूद रद्द करावी,  अशी एकमुखी मागणी संपूर्ण राज्यात सर्वच शिक्षक संघटना कर त आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे संपूर्ण राज्यात  शिक्षकांनी काळ्या फिती लावून शासनाच्या या तुघलकी  निर्णयाचा निषेध करण्यात आला.खामगाव व परिसरात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अमरावती  विभाग सहकार्यवाह राजेंद्र चौथवे यांच्या नेतृत्वात टिळक राष्ट्रीय  विद्यालय, ए.के. नॅशनल हायस्कूल, जी.वी. मेहता नवयुग  विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मूकबधीर विद्यालय, अंजुमन  हायस्कूल, आदर्श हायस्कूल निपाणा, गुप्तेश्‍वर विद्यालय शिर्ला  नेमाने, राष्ट्रमाता इंदिरा गांधी नगर परिषद हायस्कूल शेगाव येथे  काळ्या फिती लावून शासनाच्या जीआरचा निषेध करण्यात  आला.यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे खामगाव तालुकाध्यक्ष  अनिल जवंजाळ, तालुका कार्यवाह संजय बोरे, रामेश्‍वर जोहरी,  नितीन बोंबटकार, शिवदास कोल्हे, विजय जाधव, खालीद, गो पाल इंगळे, शेगावचे तालुका अध्यक्ष राजेश गवई, प्रशांत  डोईफोडे यांनी आंदोलन यशस्वितेसाठी प्रयत्न केले. 

टॅग्स :Teacherशिक्षक