लोकमत न्यूज नेटवर्क
डोणगाव: भालचंद्र नेमाडेलिखित ‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत बंजारा समाजाबद्दल अश्लील लिखाण केले आहे. त्यामुळे नेमाडे यांच्यावर कारवाईची मागणी बंजारा सेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
‘हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीत लेखक भालचंद्र नेमाडे यांनी जाणीवपूर्वक लमाण, बंजारा समाजातील स्त्रियांबाबत अभद्र आणि खालच्या पातळीचे लिखाण केले आहे. त्यांच्या या लिखाणामुळे समाजातील लोकांमध्ये प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला झाला आहे. त्यामुळे शासनाने दिलेले सर्व पुरस्कार परत घ्यावे व त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलनाचा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून अखिल भारतीय बंजारा सेना जिल्हा कोषाध्यक्ष सुधाकर राठोड, राजेश राठोड, चेतन चव्हाण, संदीप राठोड, भाऊराव जाधव, संतोष चव्हाण, ऋषिकेश राठोड, विजय झगरे यांनी दिला आहे.
--------