सद्यस्थितीमध्ये बाजार समितीचे सभापतीपद रिक्त असून, पदभार प्रशासक यांच्याकडे असल्याने, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित होत आहेत. बाजार समितीच्या प्रशासक, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, असे आदेशही त्यांनी दिले. ९ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवभोजन उद्घाटन प्रसंगी पालकमंत्र्यांनी सूचना दिल्या. डाॅ.राजेंद्र शिंगणे यांनी बाजार समिती यार्डमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून, कोल्ड स्टोरेज याचबरोबर व्यापाऱ्यांसाठी बांधलेले दुकाने व गोडाऊन यांची पाहणी केली.
वीज देयकांचा संभ्रम दूर करणार
कॅबिनेटच्या बैठकीमध्ये ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा करून, वीजबिलाबाबत असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांनी सांगितले. याचबरोबर अतिवृष्टी खरडून गेलेली पिके जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, याबाबत संबंधित विभागाला योग्य त्या सूचना करून शेतकऱ्यांना योग्य तो लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती शिंगणे यांनी दिली.