शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घ्या! - आमदार आकाश फुंडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 14:16 IST

राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देशेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. कोकणात १० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रात ६ हेक्टर पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.

 

लोकमत न्युज नेटवर्क खामगाव :  आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी झटणारे भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी कृषीमंत्री स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्य सदैव स्मरण रहावे तसेच शेतकºयांचे हित व्हावे यासाठी राज्य मंत्रीमंडळाने महत्वाचा निर्णय घेत त्यांच्या नावाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेची तातडीने अंमलबजावणी करीत नुकतेच राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकºयांकडून उपरोक्त योजनेतून लाभ घेण्यासाठी अर्ज मागविले आहेत. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांनी आपले संपुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी खर्चीले, त्यांचे कार्य अफाट आहे.  त्यांच्या निधनानंतर त्यांचे कार्य सदैव स्मरणात रहावे यासाठी राज्यातील फळ बागायतदार शेतकरी अधिकाधिक झपाट्याने विकसीत व्हावा, त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी राज्याच्या मंत्रीमंडळाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात राबविण्याचा महत्वाकांक्षी निर्णय काही दिवसापुर्वीच घेतला आहे.  या योजनेची जाहीरात आज प्रकाशीत करण्यात आली  या योजनेत फळबांगांच्या लागवडीसाठी शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतक-याकडून  अर्ज मागविण्यात आले आहेत. खामगांव मतदार संघातील शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे. या योजनेमध्ये आंबा, डाळींब, काजु, पेरू, सिताफळ, आवळा,  चिंच, जांभुळ, कोकम, फणस,कागदी लिंबु, चिकु, संत्रा, मोसंबी, अंजीर व नारळ या फळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कोकणात १० हेक्टर तर उर्वरीत महाराष्ट्रात ६ हेक्टर पर्यंत शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात. याबाबतचा संपुर्ण विस्तृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.  ह्यभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाह्णया नव्या योजनेमुळे स्व.भाऊसाहेबांच्या स्वप्नांप्रमाणे शेतकºयांचा खरा विकास होऊन शेतकरी स्वावलंबी व्हावे यासाठी शेतक-यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर