शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टी-१ सी-१ मुळे टायगर कॉरिडॉर निर्मितीला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 10:59 IST

अभयारण्याच्या संवर्धनासोबतच टायगर कॉरिडॉर निर्मितीला चालणा मिळण्याचे संकेत आहेत.

- नीलेश जोशी  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गेल्या सात महिन्यापासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये स्थिरावलेल्या टी-१ सी-१ वाघामुळे आता बुलडाणा, अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील अभयारण्याच्या संवर्धनासोबतच टायगर कॉरिडॉर निर्मितीला चालणा मिळण्याचे संकेत आहेत.ज्ञानगंगा अभयारण्यातीलवाघाच्या अधिवासाबद्दल एक समिती नियुक्त करण्यात आलेली असून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक एम. एस. रेड्डी अध्यक्ष असलेल्या या समितीची सोमवारी व्हीसी झाली. त्यास वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे डॉ. बिलाल हबीव, अकोला विभागीय वन्यजीव अधिकारी एम. एन. खैरनार व अन्य सदस्य या बैठकीस उपस्थित होते. त्यामध्ये ज्ञानगंगा अभयारण्य हे वाघाच्या अधिवासासाठी योग्य असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असून भविष्यातील वाघाच्या अधिवासाचा विस्तार होण्याची शक्यता पाहता अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा, बुलडाणा जिल्ह्यातील अंबाबरवा आणि जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई भवानी अभयारण्याचे त्यादृष्टीने संवर्धन करून टायगर कॉरिडॉर निर्मितीच्या दृष्टीने विचार मंथन झाले. या चारही ठिकाणी वाघाच्या अधिवासासाठी स्थिती योग्य असल्याचे मत या व्हीसीमध्ये व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान जवळपास १७०० किमीचा प्रवास करून टी-१-सी-१ हा ज्ञानगंगामध्ये आला आहे. येथील अधिवास वाघाच्या अस्तित्वासाठी पुरक असल्यानेच तो येथे थांबला आहे. त्यामुळे येथे या आता प्रोढ झालेल्या वाघासाठी वाघिण आणण्यासंदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुषंगाने कोवीड संसर्गचा स्थिती व पुढील निधीचा प्रश्न हे मुद्दे अभ्यासून सहा महिन्यांतर अनुषंगीक विषयावर निर्णय घेण्याबाबत चर्चेमध्ये एकमत झाल्याची माहीती सुत्रांनी दिली. पेंच किंवा ताडोबा अभयारण्यातून सहजतेने टी-१ सी-१ ला सहचारीणी मिळण्यात अडचण नसल्याचेही समोर आले आहे.

ज्ञानगंगाचा अधिवास वाघांसाठी योग्यज्ञानगंगा अभयारण्याचा अधिवास हा वाघांसाठी योग्य असल्याचा निष्कर्ष यासंदर्भात नियुक्त करण्यात आलेल्या समितीने काढला असून ज्ञानगंगामध्ये प्रती चौरस किमी १८ प्राणी असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा दर अपेक्षा पेक्षा खूप अधिक आहे. सध्याच १३ पेक्षा अधिक बिबट या अभयारण्यात असल्याने हिंस्त्र प्राण्यांसाठी आवश्यक असणारी अन्न साखळी व त्यातल्या त्यात वाघांसाठी आवश्यक असलेले खाद्य येथे उपलब्ध आहे., चितळ, सांबळ, नील गाय, रानडुक्कर यांचीही संख्या येथे अधिक आहे, त्यामुळेच टी-१सी-१ येथे थांबलेला आहे.

ज्ञानगंगाचा विस्तार आवश्यकज्ञानगंगा अभयारण्याचा विस्तार २०५ चौरस किमी आहे. वाघांसाठी सरासरी ८०० ते एक हजार चौरस किमी विस्तार असलेले जंगल आवश्यक आहे. त्यादृष्टीनेच काटेपूर्णा, अंबाबरवा आणि मुक्ताई भवानी अभयारण्याचा कॉरिडॉर विकसीत करण्याच्या दृष्टीने सध्या मंथन सुरू आहे.

 

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यbuldhanaबुलडाणाTigerवाघ