शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांचे लाक्षणिक उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 14:13 IST

संग्रामपूर पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. 

वरवटबकाल :  शिक्षकांच्या विविध प्रलंबीत मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा संग्रामपूरच्या वतीने संग्रामपूर पंचायत समिती समोर लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी, सहावा वेतन आयोग थकबाकी मिळणे बाबत, वेतन तफावत, भविष्य निर्वाह निधी, डी.सी.पी.एस. धारकांचा सहावा वेतन आयोग हप्ता जमा करण्यासंदर्भात शिक्षक संघटनेने नेहमी पाठपुरावा केला. याच अनुषंगाने संग्रामपूर  गटशिक्षणाधिकारी यांना  तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रकारच्या समस्या निवारण सभा घेण्यात आली. शिक्षकांच्या समस्या मांडुन २० जुलै २०१९ रोजी समस्या निवारण सभेत शिक्षकांचे विविध प्रश्न व समस्या  गटशिक्षणाधिकारी यांच्या समक्ष मांडण्यात आल्या होत्या. वेळोवेळी पाठपुरावा पण केला परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून अद्यापही काही महत्वाच्या समस्या सोडवण्याबाबत तत्परता दिसली नाही, त्यानंतर अनेक समस्या वाढतच गेल्या. वैयक्तिक शिक्षकांचे अनेक प्रश्न व समस्या ह्या तशाच पेडींग राहत असल्याने त्यानुसार अ.भा.शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष दि.रा.भालतडक, जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पाटील, राज्य चिटणीस गौतमराव मारोडे यांच्या मार्गदर्शनात एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनात शिक्षकांच्या सर्व पेडींग समस्या मांडण्यात आल्या होत्या.  १९ नोव्हेंबररोजी लाक्षणिक उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला होता. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या मागण्याची पूर्तता झाली नसल्याने पंचायत समिती समोर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका संग्रामपूर च्या वतीने लाक्षणिक उपोषण सुरु केले आहे. यामध्ये राज्य चिटणीस गौतमराव मारोडे, तालुकाध्यक्ष शाम कौलकार, शिक्षक पतसंस्था अध्यक्ष भास्कर डोसे, शिक्षक अनिल धनभर, मिलिंद सोनोने, देविदास बावस्कर, सुधीर दाते, संतोषराव मोरखडे, प्रेमलाल जावरकर ,वसंत खंडारे,उमाशंकर रंगभाल ,सौ मंदा टाले,आशा रौदळे, तुळशीराम काळपांडे,शंकर बाजोड,श्रीहरी सोळंके,भास्कर डोसे, मनोहर खंडेराव,संतोष शेडके,मुकुंद भटकर यांच्यासह आदी प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सह शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत लाक्षणिक उपोषण सोडणार नाही अशी भूमिका म.रा.प्राथमिक शिक्षक संघ संग्रामपूर शाखेने घेतली असल्याचे राज्य चिटणीस गौतमराव मारोडे यांनी सांगितले.