शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन फ्लूचा धोका वाढला!

By admin | Updated: May 19, 2017 00:08 IST

नगरपालिकेच्या निविदेकडे दुर्लक्ष : डुकरे पकडण्याची मोहीम कागदावरच!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला स्वाइन फ्लू ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. शहरात डुकरांची संख्या वाढली असून, डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यासाठी नगरपालिकेने निविदा काढली आहे; मात्र डुकरे पकडण्याची मोहीम कागदावरच असल्याने बुलडाण्यात स्वाइन फ्लूचा धोका वाढला आहे. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो. स्वाइन इन्फ्लुएन्झा किंवा स्वाइन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे; हा डुक्करामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. त्यामुळे डुकरांची वाढती संख्या व अस्वच्छता स्वाइन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजारांना आमंत्रण देत आहे. बुलडाणा शहराच्या प्रत्येक चौकात व सार्वजनिक ठिकाणी डुकरांचा वावर दिसून येत आहे. तसेच मोकळ्या मैदानामध्ये व घाणीने तुंबलेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर डुकारांचे प्रमाण वाढले आहे. बुलडाणा शहर व ग्रामीण परिसरात सध्या स्वाइन फ्ल्यूचा कहर सुरू असून, स्वाइन फ्लूसाठी कारणीभूत ठरत असलेल्या डुकरांचा मात्र मुक्त संचार आहे. शहरातील बसस्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरातही डुकरांचा सर्रास वावर असल्यामुळे स्वाइन फ्ल्यूचा धोका वाढण्याची शक्यता आहे. डुकरांची वाढती संख्या शहरवासीयांच्या अरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नागरिकांसाठी डुकरांचे वाढते प्रमाण डोकेदुखी ठरत आहे. डुकरांची संख्या वाढत असल्याने व त्यावर पयबंद घालण्यासाठी नगरपालिकेने शहरातील डुकरे पकडण्याकरिता आठ दिवसाअगोदर एक निविदा काढली आहे. निविदा भरताच डुकरे पकडण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याने प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. निविदेव्यतिरिक्त पकडलेल्या प्रत्येक डुकरामागे निविदाधारकास वेगळा मोबदलाही देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच पकडलेली डुकरे कुठेही विकण्याची मुभा नगर पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे; मात्र नगरपालिकेने निविदा काढल्यानंतरही शहरात डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शहरवासीयांना स्वाइन फ्लूसारख्या विषाणूजन्य आजराचा धोका निर्माण झाला आहे.