शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

हिवरा आश्रम येथे स्वामी विवेकानंद, शुकदास महाराजांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 12:48 IST

लाखो भाविक-भक्तांच्या १०० रांगा, त्यातून पुरी व वांगेभाजी घेऊन निघालेले १०१ ट्रॅक्टर्स आणि त्यातून वैदर्भिय चवीसाठी देशभर ख्यातकीर्त पावलेला अनोखा महाप्रसाद वाटप हिवरा आश्रम येथे १७ जानेवारीला झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: लाखो भाविक-भक्तांच्या १०० रांगा, त्यातून पुरी व वांगेभाजी घेऊन निघालेले १०१ ट्रॅक्टर्स आणि त्यातून वैदर्भिय चवीसाठी देशभर ख्यातकीर्त पावलेला अनोखा महाप्रसाद वाटप हिवरा आश्रम येथे १७ जानेवारीला झाले. यावेळी सहा हजार स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पथकाचे प्रदर्शन भाविकांनी अनुभवले.शुकदास महाराज व स्वामी विवेकानंदांचा जयघोष ही महापंगत पार पडली. महाप्रसाद वितरणाची सुरूवात जेष्ठ उद्योगपती व शिक्षणमहर्षि नानजीभाई ठक्कर यांच्याहस्ते झाले. यावेळी राज्याचे अन्न व औषध मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनिषा पवार, जालनाचे उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ, काँग्रेसचे जेष्ठ नेते श्याम उमाळकर, बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाष्करराव ठाकरे, काँग्रेसचे जेष्ठ नेते लक्ष्मण घुमरे, भाजपचे जेष्ठ नेते सुभाषआप्पा खबुतरे, मुंबईतील जेष्ठ उद्योगपती एकनाथराव दुधे, पुरूषोत्तम सांगळे, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, भाजपचे नेते संजय चेके-पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख भाष्करराव मोरे, ऋषी जाधव, मेहकर पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव, आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्यावतीने त्यांचे बंधू प्रमोद रायमूलकर, जिल्हा परिषदेचे सदस्य संजय वडतकर, अंजनगाव सूर्जी येथील देवनाथ पीठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, आसोबा संस्थानचे अध्यक्ष भारती महाराज, काँग्रेसचे मेहकर तालुका अध्यक्ष देवानंद पवार, गजानन सावंत, संपतराव देशमुख, जिजाऊ पतसंस्थेचे अध्यक्ष नंदाराम काळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश बोचरे, सुरेश मवाळ, माजी उपसभापती बबनराव लहाने आदी उपस्थित होते.या सर्व मान्यवरांनीही या अनोख्या चवीसाठी प्रसिद्ध पावलेल्या महाप्रसादाचा लाभ घेऊन आनंद व्यक्त केला. या भाविकांना प्रविण शेळके यांच्यावतीने आरओचे शुद्धपाणी मोफत वाटप करण्यात आले. ही महापंगत यशस्वी करण्यासाठी विवेकानंद आश्रम परिवारासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ व सहा हजार स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याचे संचलन वेदान्ताचार्य गजाननदादा शास्त्री व प्राचार्य पंढरीनाथ शेळके यांनी केले. हा महासोहळा यशस्वी करण्यासाठी साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन चोख बंदोबस्त ठेवला होता.  

टॅग्स :buldhanaबुलडाणा