शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानीला हवी विधान परिषदेची एक जागा;  रविकांत तुपकर यांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 19:11 IST

रविकांत तुपकर यांच्या नावाचा विचार प्रामुख्याने होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे.

बुलडाणा: विधान परिषदेच्या २१ मे रोजी नऊ जागांसाठी निवडणूक होत असून या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभीमानी शेतकरी संघटनेला एक जागा सोडावी अशी स्वाभीमीनी शेतकरी संघटनेची भूमिका समोर येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची हुकलेली संधी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने साधली जाते की काय? या बाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आग्रही होती. राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जोगवर हक्क सांगितला होता. यापूर्वीपासून तशी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच होती. मात्र स्वाभीमानीची आक्रमक भूमिका बुलडाणा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची होती.  महाविकास आघाडीच्या वाटाघाटीही सुरू होत्या. त्या दरम्यान, स्वाभीमनी शेतकरी संघटनेने बुलडाण्याच्या जागेवरील हक्क सोडावा, त्याबदल्यात विधान परिषदेच्या निवडणुकीत बघू अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. त्यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सांगलीची जागा मिळाली होती.या सर्व पार्श्वभूमीवर २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होत असून या निवडणुकीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेला एक जागा दिली जावी, अशी मागणी आता स्वाभीमनी शेतकरी संघटनेच्यावतीने आघाडीचे समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भाने एक पत्र स्वाभीमानी शेतकरी संघटनेने दिले असल्याची माहिती आहे.त्यामुळे स्वाभीमानी शेतकरी संघटनेला विधान परिषदेची एक जागा मिळाल्यास स्वाभीमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नावाचा विचार प्रामुख्याने होऊ शकतो, असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. मात्र प्रत्यक्ष वाटाघाटीत काय निर्णय होतो व स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी कोणती भूमिका घेतात, यावर अनेक बाबी अवलंबून आहेत. मात्र या निमित्ताने पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रविकांत तुपकरांच्या रुपाने बुलडाण्याचे नाव चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणकीवेळी बुलडाण्याच्या जागेवरील हक्क स्वाभीमानी शेतकरी संघटनेने सोडला होता. त्यामुळे विधानस परिषदेची एक जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांकडूनही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना