चिखली : येथील नाफेड केंद्रावर विनाटोकन मोजमाप सुरू असलेले २00 पोती तूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ४ मे रोजी पकडून याबाबत कृषी पणन राज्यमंत्नी यांचे विशेष कार्याधिकारी घुले यांच्याकडे तक्रार केल्याने, या तक्रारीची गंभीरतेने दखल घेऊन, ६ मे रोजी जिल्हा पणन व्यवस्थापक ए.पी. पाटील यांनी चिखली नाफेड केंद्र गाठून, या प्रकरणाची चौकशी केली व कारवाईचे आश्वासन दिले. याबाबत माहिती शेतकर्यांनी स्वाभिमानीच्या पदाधिकार्यांना दिल्याने त्यांनी तत्काळ नाफेड केंद्र गाठले. या ठिकाणी ५८ कट्टे मोजमाप झाले होते, त्यामुळे उर्वरित कट्टय़ाचे मोजमाप स्वाभिमानीने टोकन नसल्याकारणाने रोकून धरल्याने या सर्व बाबीचा पंचनामा करण्यात आला होता. तसेच याबाबत कृषी व पणन राज्यमंत्नी यांचे विशेष कार्य अधिकारी घुले यांना चिखली नाफेड केंद्रावर होत असलेल्या काळ्याबाजाराबद्दल माहिती देऊन २00 पोती विनाटोकनाची तूर मोजण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याबाबत घुले यांनी तत्काळ चौकशीचा आदेश दिल्याने जिल्हा पणन व्यवस्थापक ए.पी. पाटील यांनी चिखली नाफेड केंद्र गाठून प्रकरणाची सखोल चौकशी केली व याबाबत अहवाल सदर केला. सदर तुरीचा कुणीही मालक सापडून आला नाही, तर तूर जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असे सांगून व संबंधित दोषींवर मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सहकारी संस्थेचे अधिकारी गारोळे, बाजार समितीचे चिंचोले, शिपणे, स्वाभीमानीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक, नितीन राजपूत, दीपक सुरडकर, भरत जोगदडे, अनिल वाकोडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
‘स्वाभिमानी’ने पकडली विनाटोकन मोजमाप होणारी तूर!
By admin | Updated: May 8, 2017 02:30 IST