शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव बाजार समितीच्या आठ व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 15:38 IST

खामगाव: शेतमालाची नियमबाह्य पध्दतीने उलटी हर्रासी केल्याप्रकरणी बाजार समितीने आठ व्यापाऱ्यांचे परवाने पाच दिवसांसाठी निलंबित केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेतमालाची नियमबाह्य पध्दतीने उलटी हर्रासी केल्याप्रकरणी बाजार समितीने आठ व्यापाऱ्यांचे परवाने पाच दिवसांसाठी निलंबित केले आहेत.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ मार्च रोजी शेतमालाची उलट्या पध्दतीने हर्राशी केली जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला होता. याचे स्टिंग आॅपरेशन ‘लोकमत’ने केले होते. त्याची दखल घेत तीन तासात जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी बाजार समिती प्रशासनाला संबंधीत प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. लोकमत फेसबूक लाईव्हची लिंक सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती. याप्रकरणी कृउबासने ३ अडते व ६ खरीददार व्यापारी अशा ९ जणांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या.दरम्यान, या प्रकरणी दोषी आढळलेल्या ८ व्यापाऱ्यांवर बाजार समितीने परवाने निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी मोहता नवनीत एन्टरप्राईजेस, प्रमोद प्रेमसुखदास चांडक, हर्षद ट्रेडींग कंपनी, सुनील रामपाल खंडेलवाल गिरीष इंडस्ट्रीज, श्रेष्ठकुमार कृष्णकुमार भाटीया, चोपडा कॉर्पोरेशन व घनश्यामदास नारायणदास गांधी यांचे परवाने आजपासून ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आल्याची माहिती कृउबास सचिव जाधव यांनी दिली. या कारवाईने कृउबास वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावMarket Yardमार्केट यार्ड