बुलडाणा : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामामध्ये मंजूर अंदाजपत्रकापेक्षा २ लाख ६६ हजार ६२४ रुपयांचे अतिरिक्त देयके देण्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.एच.भगत तसेच तत्कालीन ग्रामसेविका के.बी.जाधव यांना मंगळवारी निलंबित केले आहे. याच प्रकरणात गुरूवारी चिखली पंचायत समितीचे तत्कालीन सहायक लेखाधिकारी आर.बी. सावळे यांना निलंबित केले आहे. तर जिल्हा परिषदेचे सहायक ले खाधिकारी आर.जी.झनके यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे यशवंत ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत रस्ताकाम करण्यात आले. ग्रामपंचायतीने केलेले काम हे मंजूर दराप्रमाणे ७ लाख ६६ हजार ४७६ रूपयांचे होते; मात्र या कामाचे दयेके काढताना संबंधित शाखा अभियंता आर.एच.भगत यांनी सदर कामाच्या देयकाची बेरिज ही १0 लाख ६0 रूपये असे दाखवून सदर देयक प्रदान केले. सदर कामाचे लेखा परिक्षण करताना ही बाब समोर आली असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बांधकाम विभागाचे सहायक अभियंता ङ्म्रेणी-१ यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत करून चौकशी करण्यात आली. या समितीच्या अहवालावरून हलगर्जीपणा करणारे शाखा अभियंता भगत तसेच तत्कालीन ग्रामसेविका के.बी.जाधव यांना निलंबित केल्यानंतर आता चिखली पंचायत समितीचे तत्कालीन सहायक लेखाधिकारी सावळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे तर जि. प.चे सहायक लेखाधिकारी आर.जी.झनके यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
धोत्रा भनगोजी रस्ताप्रकरणी सहायक लेखाधिकारी निलंबित
By admin | Updated: February 28, 2015 01:15 IST