शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

खामगावातील सूर्योदय पारधी आश्रम शाळेला संघाचे ‘टॉनिक’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 14:28 IST

खामगाव :  आध्यात्मिक  गुरू राष्ट्रसंत स्व. भय्यूजी महाराजांनी खामगावात सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक धावून आलेत.

ठळक मुद्देस्व. भैय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे पारधी समाजातील मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या आश्रमशाळेचा गेल्या काही वर्षांपासून संघ स्वयमंसेवकांकडून विस्तार आणि विकास करण्यात येत आहे.

- अनिल गवई

खामगाव :  आध्यात्मिक  गुरू राष्ट्रसंत स्व. भय्यूजी महाराजांनीखामगावात सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेच्या मदतीला संघाचे स्वयंसेवक धावून आलेत. संघ स्वयंसेवकांच्या मदतीतूनच यापुढे या आश्रम शाळेच्या विस्तार आणि विकास करण्यात येणार असून, आश्रमशाळेसाठी बांधण्यात आलेल्या नूतन वास्तूच्या लोकार्पणासाठी ९ सप्टेंबर रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांची खामगाव येथे उपस्थिती लाभणार आहे.

आध्यात्मिक गुरू स्व. भैय्युजी महाराजांच्या प्रेरणेतून खामगाव तालुक्यातील सजनपुरी येथे पारधी समाजातील मुलांसाठी आश्रमशाळा सुरू करण्यात आली आहे. या आश्रमशाळेचा गेल्या काही वर्षांपासून संघ स्वयमंसेवकांकडून विस्तार आणि विकास करण्यात येत आहे. यासाठी पुणे येथील संघ स्वयमंसेवक अनिरूध्द देशपांडे यांच्या पुढाकारातून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नूतन वसतीगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे. सोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना इतरही सुविधा पुरविण्यात येत आहेत. यासाठी स्व. भैय्यूजी महाराज हयात असताना एक करारपत्रही करण्यात आले.

 सद्यस्थितीत इमारत फळास आली असून या इमारतीचे ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता सरसंघचालकांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येईल. यावेळी आश्रम शाळेतील पारधी समाजातील विद्यार्थ्यांशी सरसंघचालक मोहन भागवत हितगूज देखील साधणार आहेत. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, सरसंघचालकांच्या स्वागतासाठी रजतनगरी सज्ज होत आहे. लोकार्पणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सरसंघचालक खामगावतील एका स्वयंसेवकाच्या घरी सायंकाळचे जेवण सुध्दा घेतील. मात्र, सरसंघचालकांच्या या नियोजीत कार्यक्रमाबद्दल अतिशय गोपनियता पाळल्या जात आहे. 

पारधी समाजाचा मेळावा!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत सजनपुरी येथील सूर्योदय पारधी आश्रमशाळेत पारधी समाजाचा हितगूज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात संघर्षातून पुढे गेलेल्या पारधी समाजातील प्रशासकीय अधिकाºयांचा सत्कारही करण्यात येईल.

स्व. भैय्युजी महाराजांच्या इच्छेनुसार संघाची मदत!

खामगाव येथील सजनपुरी भागातील सूर्याेदय पारधी आश्रम शाळेचा विस्तार आणि विकास करण्याचा आग्रह  स्व. भैय्युजी महाराजांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे धरला होता. त्यानुसार गेल्या चार-पाच वर्षांपासून संघ स्वयंसेवकांकडून सूर्योदय पारधी आश्रम शाळेत संघाच्या स्वयंसेवकांकडून विविध विकास कामे केली जाताहेत.

सजनपुरीतील आश्रमशाळा टाकणार कात!

भैय्युजी महाराजांनी सुरू केलेल्या सूर्योदय पारधी आश्रम शाळेला आता संघ आणि संघ स्वयंसेवकांची मदत मिळणार आहे. थोडक्यात संघाच्या ‘टॉनिक’ने आश्रमशाळा कात टाकणार असून, या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच पारधी समाजाचा सर्वांगिण विकास घडवून आणल्या जाणार आहे.

टॅग्स :khamgaonखामगावRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBhayyuji Maharajभय्यूजी महाराज