शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
3
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
4
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
5
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
6
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
7
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
8
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
9
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
10
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
11
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
12
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
13
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
14
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
15
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
16
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
17
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
18
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
19
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
20
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी

‘ड्रोन’द्वारे गावठाणांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 11:13 IST

बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार २८ गावांचे ड्रोन सर्व्हेक्षण यातंर्गत करण्यात येणार आहे.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : वाढती लोकसंख्या, विकासाच्या विविध योजना व जमीन हस्तांतरणाचा वाढलेला वेग पाहता ग्रामीण भागात गावठाणचे अभिलेखे अद्ययावत करण्यासोबतच मालमत्तांमध्ये अधिक सुस्पष्टता येण्याच्या दृष्टीकोणातून डेहराडून येथील भारतीय सर्व्हेक्षण विभाग आणि जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने गावठाणातील मिळकतींचे सर्व्हेक्षण करून प्रतिमांचे भू संदर्भीकरम (जीईओ-रेफरन्सींग) द्वारे गावठाणाचे डिजीटल नकाशे तयार करण्याची मोहिम जिल्ह्यात लवकरच सुरू करण्यात येत आहे. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार २८ गावांचे ड्रोन सर्व्हेक्षण यातंर्गत करण्यात येणार आहे.राज्यात २२ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यानुषंगाने गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली होती तर २१ जानेवारी २०२० रोजी गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविण्याबाबत मार्गदर्शक सुचनाही जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुषंगाने राज्यातील जवळपास ४० हजार गावठाणांमध्ये ड्रोन सर्व्हेक्षण करण्यात येवून अलिकीडल काळात गावाठाणांचा झालेला विस्तार, नव्याने तयार झालेल्या मालमत्तांचे सर्व्हेक्षण करून गाव पातळीवर तथा वैयक्तिक पातळीवर मिळकतपत्र (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध करण्याची व्यापक मोहिम राबविण्यात येत आहे. नगर, सातारा जिल्हयात या मोहिमेस प्रारंभ झाला असून बुलडाणा जिल्ह्यातही ही मोहीम येत्या काळात सुरू होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहे. सर्व्हे आॅफ इंडियाकडून सर्व मिळकतींचे सर्व्हेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. त्यातून तयार होणारा जीेएसआय डाटा (नकाशातील मिळकती) ग्रामपंचायतींच्या मिळकत रजिस्टरशी जोडण्यात येवून जीेसआयवरआधारीत मिळकत पत्रक तयार केले जाणार आहे.काय होईल फायदा१९९० नंतर राज्यातील गावठाणांचा विस्तार झाला आहे. त्याची अचूक मोजणी होईल, गावाची मालमत्ता तथा प्रत्येक व्यक्तीच्या मालमत्तेचा डिजीटल नकाशा उपलब्ध होईल तथा मालमत्तांसदर्भातील हक्क व दावे सहजतेने निकाली काढण्यासोबतच ग्रामपंचायतींना मालमत्तांची अचूक माहिती मिळाल्यामुळे कर वसुली वाढले व पर्यायाने शासनाच्या महसुलात भर पडण्यास मदत होईल. तसेच शासनाच्या व नागरिकांच्या मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्डही उपलब्ध होतील.

शासनाच्या मिळकतींचे संरक्षण करणे होईल सोपेशासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण करणे यामुळे सोपे होणार आहे. गावातील घरे, रस्ते, खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन असा जमीनीवरील अतिक्रमण निर्मुलन करण्यास मदत होऊन मिळकतींचा नकासा अधिक अचूकपणे उपलब्ध होईल. प्रशासकीय नियोजनासाठी गाठाण भूमापन नकाशे उपलब्ध होवून विकासाची कामे प्रभावीपणे करता येतील.

जिल्ह्यातील १४३३ पैकी १४५ गावांचे नगरभूमापन पुर्णत्वासग्रामीण भागाचेही मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होत असून वर्तमान स्थितीत ५५ टक्के नागरिक हे ग्रामीण भागात राहत आहे. १९९० च्या दशकापासन मालमत्ता हस्तांतरणासह गावठाणांच्या हद्दीचा विस्तार झाला आहे. त्यामुळे नगरभूमापनाला महत्त्व आहे. त्या पार्श्वभूमीवल बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत १४५ गावांचे नगर भूमापन झाले आहे तर चौकशीस्तरावर सध्या ४७ गावातील कामे आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाRevenue Departmentमहसूल विभाग