कोविशिल्डच का?
जिल्ह्यात दोन्ही लसींपैकी कोविशिल्ड घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोविशिल्डच का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोविशिल्डच लसीचा पुरवठा जास्त असल्याने याचे लाभार्थी अधिक असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड ह्या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. दोन्ही लसी भारतीय आहेत. त्यामुळे कोणत्या लसीला पसंती द्यायची हे सोडून मिळेल ती लस घेणे महत्त्वाचे आहे. कोविशिल्डचा पुरवठा जास्त असल्याने बहुतांश केंद्रांंवर ही लस आहे. त्याच्या तुलनेत कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी आहे.
डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी.
एकूण लसीकरण - ५,२७,४०५
कोविशिल्ड - ४,१४,२७९
कोव्हॅक्सिन - १,१३,१२६
वयोगटानुसार लसीकरण
१८ ते ४४ - ७३,५४६
४५ ते ५९ - १,७१,४९५
६० वर्षांवरील - १,६७,५३८