शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

हजारो हेक्टरवरील उन्हाळी भुईमूग धोक्यात!

By admin | Updated: May 14, 2017 02:28 IST

पाण्याची कमतरता: भुईमूग जगविण्यासाठी शेतक-यांची धडपड

बुलडाणा: जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाच्या सरासरी ९६0 हेक्टर क्षेत्रापैकी ३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे; मात्र भुईमुगाला पाणी अपुरे पडत असल्यामुळे हजारो हेक्टरवरील भुईमुगाने माना टाकल्या आहेत.उन्हाळी पिकांमध्ये मका, सूर्यफूल, तीळ यापेक्षाही भुईमूग हे पीक सर्वात महत्त्वाचे समजल्या जाते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये भुईमुगाची पेरणी केल्या जाते. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांकडून उन्हाळी भुईमूग या पिकाला पसंती आहे. जिल्ह्यात उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग पिकाचे ९६0 हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नियोजन केले होते; मात्र यामध्ये ३८६.८ टक्क्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. उन्हाळी भुईमुगाचे जळगाव तालुक्यात सरासरी क्षेत्र १३0 हेक्टर असून, २८६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. संग्रामपूर तालुक्यात २४0 हेक्टर क्षेत्र असून, ३४0 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करण्यात आली आहे. चिखली तालुक्यातील नियोजित क्षेत्र २0 हेक्टर असून, १४६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यात ३0 हेक्टर क्षेत्र नियोजित व २७ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी झाली आहे. देऊळगाव राजा तालुक्यात ४0 हेक्टर नियोजन व १९७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मेहकर तालुक्यात १४0 हेक्टर सरासरी क्षेत्र असून, ६८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सिंदखेड राजा तालुक्यात नियोजन नसतानाही ८८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. लोणार तालुक्यात १२0 हेक्टर क्षेत्र असताना १८४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. खामगाव तालुक्यात १४0 हेक्टर सरासरी क्षेत्र असून, १ हजार ६३0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. शेगाव तालुक्यात २0 हेक्टर नियोजन असून, कुठेच पेरणी करण्यात आली नाही. मलकापूर तालुक्यात ४0 हेक्टर क्षेत्रापैकी ३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. मोताळा तालुक्यात ४0 हेक्टर क्षेत्रापैकी ६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. नांदुरा तालुक्यात नियोजन नसतानाही ३५ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी भुईमूग पिकाचे क्षेत्र वाढलेले असताना या पिकाला मुबलक प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भुईमूग पिकाचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी जलस्रोतांना पाणी येईल, त्या वेळेला भुईमुगाला पाणी देऊन भुईमूग जगविण्याची धडपड करत आहेत.