शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुलतानपूर : जलयुक्त शिवारची कामे लोकप्रतिनिधींनी पाडली बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्‍यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कोणतेही स्थळ सर्वेक्षण न करता अंदाजपत्रक बनवून चार साठवण बंधार्‍यांची कामे सुलतानपूर येथे सुरू होती; मात्र ...

ठळक मुद्देकामामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्कसुलतानपूर : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सुलतानपूर परिसरात सुरू असलेल्या दोन बंधार्‍यांची कामे लोकप्रतिनिधींसह काही नागरिकांनी बंद पाडली आहेत. या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत ही कामे सोमवारी बंद पाडली.जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत कोणतेही स्थळ सर्वेक्षण न करता अंदाजपत्रक बनवून चार साठवण बंधार्‍यांची कामे सुलतानपूर येथे सुरू होती; मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याची ओरड होती. कामांमध्ये कमी सिमेंटचा वापर करून कमी गेजच्या लोखंडाचा वापर करण्यात येत असल्याचा आक्षेप आहे. खोदकामामध्ये मुरुमाचा वापर न करता मातीवरच बेड काँक्रीट अंथरल्या गेले आहे. हा प्रकार स्थानिक लोकप्रतिनिधींच्या लक्षात येताच त्यांनी कामाचे अंदाजपत्रक मागून ही कामे गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी केली होती; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्या जात होते. परिणामी, जि.प.सदस्य पती दिलीप वाघ, लोणार पंचायत समितीचे गटनेते तथा पं.स.सदस्य डॉ. हेमराज लाहोटी, माजी सरपंच विजय खोलगडे, सामाजिक कार्यकर्ते संतोष रिंढे, रामेश्‍वर मंत्री यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन हे काम बंद पाडले. जोपर्र्यंत दर्जेदार कामाची हमी मिळणार नाही, तो पर्यंत हे काम होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. १५ जानेवारीला हे काम बंद पाडण्यात आले. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे सिंचन विभागातील अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, शिवणी पिसा परिसरातही जलयुक्तची कामे सुरू असून, तेथेही कामाची योग्य पद्धतीने गुणवत्ता राखल्या जात नसल्याची ओरड आहे. यासंदर्भात आता प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सध्या लक्ष लागून आहे.

अभियंता ‘नॉट रिचेबल’यासंदर्भात जिल्हा परिषदेचे अभियंता काळवाघे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांचा भ्रमनध्वनी ‘नॉट रिचेबल’ होता. त्यामुळे त्यांची याबाबत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

शिवार फेरींतर्गत सुलतानपूरची निवडशासनाच्या शिवार फेरी दरम्यान सुलतानपूर गावाची जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवड झाली होती. वेगवेगळ्य़ा विभागाकडे येथील कामे सोपविण्यात आली आहेत; परंतु प्रारंभी कोणत्याच विभागाने कृती, अंदाज पत्रके बनवलीच नसल्याची माहिती समोर येत आहे. आधीच येथील टंचाईचा प्रश्न मोठा आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाJalyukt Shivarजलयुक्त शिवार