शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सुजलाम् सुफलाम्’चे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम- शांतीलाल मुथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 13:36 IST

दोन वर्षात प्रकल्पातंर्गत झालेले काम व पुढील काळात करावयाच्या कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोणातून बैठक घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या सुजलाम सुफलाम प्रकल्पांतर्गत जवळपास एक हजार २५५ ठिकाणी जलसंधारणाची कामे करण्यात आली असून त्यातंर्गत निघालेल्या गाळामुळे शेतकऱ्यांची जमीन सुपीक बनण्यास मदत झाली असून या प्रकल्पाचे जिल्ह्यात सकारात्मक परिणाम समोर येत असल्याचे मत बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालयात २६ फेब्रुवारी रोजी गेल्या दोन वर्षात प्रकल्पातंर्गत झालेले काम व पुढील काळात करावयाच्या कामांचा आढावा घेण्याच्या दृष्टीकोणातून बैठक घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केली. या बैठकीस जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, शांतीलाल मुथ्था, बीजेएसचे जिल्हा समन्वयक राजेश देशलहरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी राजाराम पुरी, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.सुमन चंद्रा रुजू झाल्यानंतरची ही पहिलीच सुजलाम सुफलामची बैठक होती. त्यानुषंगाने राजेश देशलहरा यांनी त्यांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. जिल्हा प्रशासन आणि बीजेएसच्या वतीने मार्च २०१८ पासून जेसीबी, पोकलेन असा १६८ मशीनन्सच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे १३ ही तालुक्यात करण्यात आली. जिल्ह्यात प्रथमच झालेल्या अशा व्यापक कामामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होऊन जमिनीची सुपीकता वाढली आणि शेतकरी सुखावल्याचे चित्र असल्याचे मत शांतीलाल मुथ्था यांनी व्यक्त केले. यामुळे गारमीण भागातील अर्थकारणालाही चालना मिळाली असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले.जिल्हाधिकारी सुमन चंद्राही यांनी उपक्रमाचा सविस्तर आढावा घेऊन कामाबाबत समाधान व्यक्त केले. सोबतच शासनाच्या निर्देशानुसार लवकरच आगामी काळातील कामाची दिशा ठरविण्यात येईल, असे स्पष्ट केले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShantilal Muttha Foundationशांतीलाल मुथ्था फाउंडेशन