मोताळा (जि. बुलडाणा ) : तालुक्यातील कोल्ही गवळी येथील शेतकर्याने सततची नापिकी व कर्जाच्या डोंगराला कंटाळून विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७:५0 वाजता उघडकीस आली. गजानन हरिभाऊ मख (४0) असे या शेतकर्याचे नाव आहे. आठवडाभरातील ही लागोपाठ तिसर्या शेतकर्याची आत्महत्या आहे. गजानन हरिभाऊ मख (४0) या शेतकर्याकडे साडेतीन एकर शेती आहे. २३ फेब्रुवारी रोजी साडेबाराच्या सुमारास शौचास बाहेर जातो, असे सांगून, स्वत:च्या शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली. दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान ते शेतात अत्यवस्थ आढळून आले. त्यांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. २४ फेब्रुवारी रोजी धामणगाव बढे पोलीस स्टेशनमध्ये वर्ग केले आहे.
कोल्हीगवळी येथील शेतक-याची विष घेऊन आत्महत्या
By admin | Updated: February 27, 2015 01:49 IST