शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी दोन बाल विवाह रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 12:03 IST

Preventing child marriages : या प्रकरणी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़.

बुलडाणा : भाेकरदन जि़ जालना येथील एका १४ वर्षीय बालिकेचा सागवन बुलडाणा येथे हाेणारा विवाह चाईल्ड लाईन, बाल संरक्षण कक्षाच्या वतीने संयुक्तपणे कारवाई करून राेखला़ या प्रकरणी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. तसेच जळगाव जामाेद तालुक्यातील माेहिदेपुर येथे हाेत असलेला १७ वर्षीय मुलीचा विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे़.भोकरदन जिल्हा जालना येथील एक १४ वर्षीय बालिकेचा विवाह सागवन येथील युवकाबराेबर हाेणार हाेता़. बालिका ही जालना जिल्ह्याची रहिवाशी असून अवघ्या१४ व्या वर्षी तिच्या आई वडिलांना वराकडील मंडळींनी पैसे देउन हा विवाह आयाेजित केला हाेता़. बाल विवाह संपन्न होत असल्याची माहिती चाइल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. माहितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा बाल संरक्षण कक्षा मार्फत सर्व बाल संरक्षण यंत्रणा यांना सूचित करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत महिला बाल सहाय्यता कक्ष प्रमुख एपीआय अलका निकाळजे, बुलडाणा शहर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक सोळंके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विनायक रामोड, एएसआय राजेश गणेशे,एनसीपी भगवान शेवाळे, दीपमाला उमरकर तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांच्या मार्गदर्शनात संरक्षण अधिकारी सागर राऊत, प्रदीप सपकाळ व चाइल्ड लाईन समन्वयक शोएब शेख, बाल स्नेही कार्यकर्ते अमित देशमाने इत्यादींनी रात्री सागवान परिसरात बालिकेचा शोध घेततला़ मुलीला लग्नाची हळद लागलेली असताना पोलिसांनी बालिकेला ताब्यात घेत बाल विवाहाचा कट उधळून लावला़ तिच्या सुरक्षेसाठी तिला सखी वन स्टॉप सेंटरला रात्रीच दाखल करण्यात आले. सकाळी बालिकेला बाल कल्याण समिती बुलडाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आले़. 

जळगाव जामाेद तालुक्यातही कारवाईजळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपुर येथे देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने १७ वर्षीय बालिकेचा विवाह आई वडील व नातेवाईक यांना समज देऊन थांबविण्यात आला. माेहीदेपूर गावात एकाच मंडपात ०३ भावंडांचे लग्न नियोजित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या तीन भावंडा पैकी एका बालिकेचे वय विवाह योग्य नसल्याचे पोलिस विभागाला माहिती मिळाली होती़ माहितीची दाखल घेत गाव स्तरावर बैठक घेत गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंध अधिकारी व ग्राम बाल संरक्षण समितीच्या उपस्थिती पालकांना बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत पोलिस यंत्रणे मार्फत सदर बाल विवाह थांबविण्यात आला. विशेष म्हणजे या सर्व कार्यवाहीची धुरा पोलिस प्रशासनाने सांभाळली होती. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा