शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

संकटांच्या लाटांवर स्वार झाल्याशिवाय यशाची प्राप्ती नाही - अनुराधा सोळंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:35 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाºया (जागतिक ५४ नंबर रॅकींग प्राप्त) दिव्यांग क्रीडापटू अनुराधा सोळंकी यांच्याशी साधलेला संवाद.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्क  मनुष्य जीवनात प्रत्येकाचे  भवितव्य अस्थिर असते. मग ती सामान्य व्यक्ती असतो अथवा दिव्यांग. संकटे प्रत्येकाच्या पाचीलाच पुजलेली असतात. मात्र, वाट्याला आलेल्या कोणत्याही संकटांचा बाऊ न करता  जीवनातील संकटांच्या लाटांवर स्वार होणं, वाईटातून चांगला अर्थ काढणं आणि त्यातूनच चागलं घेणं हाच यशस्वी जीवनाचा राजमार्ग आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाºया (जागतिक ५४ नंबर रॅकींग प्राप्त) दिव्यांग क्रीडापटू अनुराधा सोळंकी यांच्याशी साधलेला संवाद.

क्रीडाक्षेत्रातील वाटचालीबाबत काय सांगाल?बालपणी पोलिओ झाल्याने दिव्यांगत्व आले. एक हात गमवावा लागल्याने इतरांपेक्षा काहीतरी कमी असल्याची जाणिव झाली. मात्र, लहानप्रेमी आपल्याच वयाची साधारण मुलं खेळत असताना त्यांच्याशी मनसोक्त खेळायची. पुढे शिक्षणानंतर परिस्थिती बेताची असल्याने मुंबई येथील मंत्रालयात वेटरची नोकरी स्वीकारली. तेथे संतोष सेजवळ यांचे मार्गदर्शन आणि मदत झाली आणि क्रीडाक्षेत्राचा  प्रवास सुरू झाला.

 तलवारबाजीकडे कशा वळलात?व्हीलचेअर तलवारबाजीपूर्वी क्रीकेट खेळण्याची आवड होती. क्रीकेटमध्ये महाराष्ट्र स्तरावर यश संपादन केले. एकाहाताने व्हॉलीबालही खेळली. मात्र, व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेने आपल्याला नावलौकीक मिळवून दिला. आता पुढील वर्षी (२०२०)मध्ये होणाºया  जागतिक व्हीलचेअर स्पर्धेसाठी आपली निवड झाली ाहे.

क्रीडाक्षेत्रात आपल्यासमोर आव्हानं कोणती?  घरची परिस्थिती जेमतेम असतानाही कोच आणि दानशुरांच्या च्या मदतीने आपण आतापर्यंतचा प्रवास केला आहे. आगामी थायलंड येथे होणाºया स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. दानशूर आणि क्रीडापे्रेमींच्या मदतीवरच आपली पुढील वाटचाल अवलंबून आहे.

संकटे आणि दु:खाचे एक वैशिष्टये आहे. जो सहन करतो, त्याच्यावरच त्यांचे प्रेम असते. बालपणी पोलिओ झाल्यामुळे एक हात गमवावा लागला. इतरांपेक्षा आपल्यात काहीतरी उणिव आहे. याची खंत मनात होती. मात्र, ज्यावेळी दोन हात आणि पाय नसलेल्या व्यक्ती पाहील्या. त्यावेळी जिद्दीने जगण्याचे ठरविले आहे. जीवनात आपले आदर्श कोण?राजमाता जिजाऊ यांचे माहेर असलेल्या जिल्ह्यातील आपलं वास्तव्य आहे. त्यांनी अतिशय  प्रतिकुल परिस्थितीत शिवाजी राजांना घडविले. त्यामुळे मॉ जिजाऊ, महिलांच्या शिक्षणाची ज्योत सावित्रीमाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि अनाथांच्या आयुष्यात उमेद जागविणाºया सिंधूताई सपकाळ आपल्या आदर्श होत. मात्र, क्रीडाक्षेत्रातील भरारीचे संपूर्ण श्रेय  संतोष सेजवळ( कोच) आणि गणेश जाधव यांना जाते. त्यांनीच माझ्यातील क्रीडापटू जागा केला. त्यांच्यामुळेच व्हील चेअर जागतिक तलवारबाजी स्पर्धेत अपेक्षीत यश मिळवू शकले.  आताही परिस्थितीमुळेच थायलंड येथील जागतिक स्पर्धेत सहभागी होण्याचे मोठं आव्हान माझ्यापुढे उभं आहे. मात्र, समाजातील अनेक सकारात्मक व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावinterviewमुलाखत