शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मोफत चारा बियाण्यासाठी अनुदान केवळ १५ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 14:17 IST

२५ लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता जिल्ह्याला केवळ १५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गतवर्षी चारा पिकासाठी गाळपेर योजना राबविण्यात आली होती; मात्र यंदा अतिपावसाने गाळपेरासाठी क्षेत्रच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोईनुसार चाºयाची लागवड केली जाणार आहे. सध्या चारा बियाणे मोफत वाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी २५ लाख रुपये अनुदानाची मागणी केली असता जिल्ह्याला केवळ १५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले आहे.जिल्ह्यात १० लाखाच्या घरात पशुधनाची संख्या आहे. दरवर्षी मार्च-एप्रिल पर्यंत चारा पुरतो. परंतू मे ते जूनदरम्यान चारा छावण्या किंवा इतर प्रकारे चाºयाचे नियोजन करण्यात येते. गतवर्षी जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी होता. त्यामुळे धरण किंवा प्रकल्पाच्या मोकळ्या झालेल्या जमिनी चारा पिकांच्या लागवडीकरिता उपयुक्त ठरल्या. पेरणीसाठी सरकारकडून शेतकऱ्यांना बियाणे व खते मोफत देण्यात आले. गाळपेरा जमिनीवर ज्वारी, बाजरी, मका या पिकांचे उत्पादन अनेक शेतकºयांनी घेतले. या पिकातून निर्माण होणारा चाºयाचा फायदा जनावरांना झाला. परंतू यंदा जिल्ह्यात परतीचा पाऊस जास्त झाल्याने गाळ पेरा होऊ शकत नाही. सर्वत्र धरण व इतर छोटे-प्रकल्प तुंडूब आहेत. त्यामुळे गाळपेरा ऐवजी यंदा शेतकºयांच्या सोईनुसार चाºयाची लागवड करण्यात येणार आहे. अतिपावसाने चाºयाचे मोठे नुकसान झालेले आहे.आतापासून चाºयाची टंचाई भेडसावत असल्याने पशुपालक चिंताग्रस्त आहेत. जिल्हा परिषदच्या पशुसंवर्धन विभागाकडून चारा नियोजनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शेतकºयांना मोफत चारा बियाण्याचे वाटप करण्यासाठी २५ लाख रुपयांची मागणी जिल्हा परिषद विभागाकडून शासनाकडे करण्यात आली होती. त्यासाठी १५ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या अनुदानातून लवकरच शेतकºयांचा चारा बियाणे वाटप होणार आहे.पाच हजार किलो बियाण्याचे होणार वाटप१० गुंठे शेतजमीनीमध्ये एक किलो चारा बियाण्याची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात जवळपास पाच हजार किलो चारा बियाण्यांचे वाटप केले जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद पशुधन विभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

असा मिळणार शेतकºयांना लाभ चारा लागवडीसाठी योग्य शेतजमीनी उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. चारा बियाण्याचा लाभ घेण्याकरीता शेतकºयांना केवळ एक अर्ज व सातबारा आवश्यक आहे. हा अर्ज आणि सातबारा आपल्या गावाला असलेले पशुवैद्यकीय अधिकाºयांकडे द्यावा लागणार आहे. त्यानंतर शेतकºयास चारा बियाणे वाटप होईल.महाबिजकडे बियाण्याची मागणीचारा पिकासाठी जिल्हा परिषदकडे ६० टक्के अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून जिल्ह्याला लागणाºया चारा बियाण्याची मागणी महाबिजकडे करण्यात आली आहे. महाबिजकडून बियाणे उपलब्ध होताच लाभार्थी शेतकºयांना बियाण्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती