शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय- दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:32 IST

Dadaji Bhuse News हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय आहे, असे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुलडाणा येथे व्यक्त केले.

 लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: हिंदुत्व प्रत्यक्ष कृतीमधून दाखविण्याचा विषय आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाची शिकवण आम्हास दिली आहे. शिवसेनेचे हिंदुत्व पाठीत खंजीर खुपसण्याचे नाही, असे मत कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी बुलडाणा येथे व्यक्त केले.अमरावती शिक्षक मतदार संघाच्या संदर्भाने महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका मेळाव्यासाठी २० नोव्हेंबरला ते बुलडाणा येथे आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. मुंबई महानगर पालिकेच्या आगामी काळातील निवडणुकांच्या संदर्भाने हिंदुत्व हा मुद्दा घेवून भाजप समोर येत असल्याची चिन्हे आहेत. त्यासंदर्भाने त्यांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी हे वक्तव्य केले. मुंबई महानगर पालिकेच्या २०२२ मधील निवडणुकींच्या अनुषंगाने भाजप हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याच्या भूमिकेत आली आहे. यासंदर्भात भाजपच्या राज्य कार्यकारणीचीही बैठक झाली होती. भाजप नेत्यांची येणारी वक्तव्ये पाहता याबाबत बुलडाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये कृषीमंत्री दादाजी भुसे यांना विचारणा केली असला शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेले हिंदुत्व आम्ही जोपासतो. त्यांनी दिलेली शिकवण ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. पाठीत खंजीर खुपसणारे हिंदुत्व आमचे नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे येत्या काळात हिंदुत्व हा मुद्दा राजकारणात चांगलाच चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दुसरीकडे वीज देयकांच्या माफी संदर्भात विचारणा केली असता कॅबिनेटच्या बैठकीत राज्यात उर्जा विषयक ६४ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी ४० हजार कोटी ही कृषी विभागाची थकबाकी आहे, असे ते म्हणाले. त्यामुळे अनुषंगीक मुद्द्यावर आपण बोलणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टींना शिवसेना प्राधान्य देते असे ते म्हणाले.बुलडाण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रीतील काही नवीन कृषी महाविद्यालयांचा मुद्दा विचाराधीन असून आम्ही सकारात्मक आहोत. मात्र सध्याची आचारसंहिता बघता यावर बोलणे उचित होणार नाही, असे ते म्हणाले. कृषी महाविद्यालयासंदर्भातील अहवालावर राज्यपालांनी काही आक्षेप नोंदवले होते. त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे ते म्हणाले. या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे आ. डाॅ. संजय रायमुलकर, संजय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. एस. लहाने, नरेश शेळके यांच्यासह शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारण